Pakistan Political Crisis: पाकिस्तानात राडा! इम्रान खान समर्थक अन् पोलिसांमध्ये हाणामारी

इम्रान खानला अटक करण्यासाठी इस्लामाबादहून पोलिसांचे एक पथक लाहोरला आले आहे.
Pakistan Political Crisis
Pakistan Political CrisisDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Political Crisis Imran Khan Arrest: पाकिस्तानातील लाहोर येथील माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या घराबाहेर त्यांचे समर्थक आणि पोलिस यांच्यात संघर्ष सुरू आहे. आज सकाळी 6 वाजता पुन्हा अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार सुरू झाला.

तोशाखाना प्रकरणी इस्लामाबाद पोलीस इम्रान खानला अटक करणार असल्याने पोलिसांच्या मोठ्या ताफ्याने त्याच्या घराला वेढा घातला आहे.

परदेशी वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सरकारी प्रवक्त्याने सांगितले की, चकमकीमध्ये दोन्ही बाजूंचे अनेक लोक जखमी झाले आहेत. कारण पोलिसांनी इम्रान खानच्या समर्थकांवर लाठीमार आणि अश्रुधुराच्या गोळ्या झाडल्या. 

  • इस्लामाबादहून पोलिस दाखल

कोर्टाच्या आदेशानुसार इम्रान खानला अटक करण्यासाठी इस्लामाबादहून पोलिसांचे एक पथक लाहोरमध्ये आले आहे . पोलिस आल्यानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थक त्यांच्या घराबाहेर जमले होते.

ते गेल्या 11 तासांपासून इम्रान खान यांच्या घराबाहेर तळ ठोकून आहेत. इस्लामाबादहून पोलिसांचे पथक आल्यानंतर त्यांचे समर्थक त्यांच्या घराबाहेर जमले.

Pakistan Political Crisis
Pakistan Economic Crisis: या कारणांमुळे 67 टक्के तरुणांनी देश सोडण्याची इच्छा केली व्यक्त

काल संध्याकाळी त्याच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ रेकॉर्ड केलेल्या स्टेटमेंटमध्ये इम्रान खान म्हणाले की, पोलीस मला अटक करण्यासाठी आणि तुरुंगात पाठवण्यासाठी आले आहेत.

मला काही झाले, किंवा मला तुरुंगात पाठवले किंवा त्यांनी मला मारले, तर इम्रान खानशिवाय हा देश संघर्ष करत राहील, हे तुम्हाला सिद्ध करावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com