Turkey-Syria Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

Turkey-Syria Earthquake: करामती पाकिस्तान! तुर्कीनं पुरावेळी पाठवलेली मदत, पाकिस्तानने भूकंपावेळी पाठवली परत

Turkey-Syria Earthquake: दरम्यान, पाकिस्तान तुर्कीला मदत पाठवल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Turkey-Syria Earthquake: सिरिया-तुर्कीमधल्या भूकंपाने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. या भूकंपात आतापर्यत मृत्यूचा आकडा 4500 पर्यंत पोहोचला आहे. तुर्की आणि सिरियामध्ये झालेल्या भूकंपात रहिवाश्यांचे अतोनात हाल झाले आहेत.

भूकंपात अनेक इमारतीदेखील जमीनदोस्त झाल्या आहेत. जगभरातून या दोन देशांना मदत पाठवली जात आहे. भारतानेदेखील ऑपरेशन दोस्त मार्फत तुर्कीला मदत पाठवली आहे.

दरम्यान, पाकिस्तान तुर्कीला मदत पाठवल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पाकिस्तानी पत्रकार शाहिद मसूद यांनी खळबळजनक दावा केला आहे. पाकिस्तानमध्ये जेव्हा पूर आला होता तेव्हा तुर्कीने पाकिस्तानला मदत केली होती. तुर्की( Turkey )ने पाठवलेली मदतीचे साहित्य आता पाकिस्तान परत तुर्कीला पाठवत असल्याचे म्हटले आहे.

शाहिद मसूद यांनी म्हटल्यानुसार,पाकिस्तानने तेच साहित्य पॅक केले आहे आणि तुर्कीतल्या भूकंपग्रस्तांना मदतीच्या नावावर तेच साहित्य परत पाठवले आहे. पाकिस्तान( Pakistan )चे प्रधानमंत्री शहबाज शरीफ वैयक्तिक पातळीवर तुर्कीतल्या भूकंपग्रस्त भागाची पाहणी करत असताना असा प्रकार लज्जास्पद आहे.

दरम्यान, या भूकंपात इमारतीखाली दबलेले कित्येक लोक अजूनही अजूनही सापडले नाहीत. बचावकार्य मोठ्या वेगाने सुरु असून अशा लोकांना शोधण्याचे काम सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: डिलिव्हरी ऑर्डर कोणाची, यावरून वाद अन् थेट हाणामारी! तरुणाला पळवून-पळवून चोपलं, व्हिडिओ व्हायरल

Riyadh Airport Missile Attack: मिसाइल कोसळताच उठला आगीचा मोठा लोळ, रियाद विमानतळावरील 'त्या' थरारक क्षणांचा हादरवणारा व्हिडिओ व्हायरल

Sudan Gold Mine Attack: सुदानमधील सोन्याच्या खाणीवर भीषण हवाई हल्ला, 72 जणांचा मृत्यू; धडकी भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

SCROLL FOR NEXT