Pakistan Inflation: दिवाळखोर PAK ने मोडले महागाईचे सर्व रेकॉर्ड, आकडे जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Pakistan Economic Crisis: आर्थिक संकट आणि चलनाच्या तुटवड्याचा सामना करत असलेल्या पाकिस्तानची स्थिती अधिक भयावह होत चालली आहे.
Pakistan Inflation
Pakistan InflationDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Economic Crisis: आर्थिक संकट आणि चलनाच्या तुटवड्याचा सामना करत असलेल्या पाकिस्तानची स्थिती अधिक भयावह होत चालली आहे. पाकिस्तानमधील वार्षिक महागाई दर या आठवड्यात विक्रमी 38.42 टक्क्यांवर पोहोचला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने पाकिस्तानमधील महागाईचा दर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.

पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या डेटाचा हवाला देऊन, एका अहवालात म्हटले आहे की, अल्पकालीन चलनवाढ मोजणारा किमती निर्देशांक (SPI) या आठवड्यात वार्षिक तुलनेत 38.42 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Pakistan Inflation
Pakistan Economy: चमत्कार! पाकिस्ताच्या संपत्तीत मोठी वाढ, तर भारताच्या परकीय गंगाजळीत घट

एसपीआय महागाई 34.83 टक्के आहे

साप्ताहिक आधारावर, मागील आठवड्यात 0.17 टक्के वाढीच्या तुलनेत SPI 2.89 टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या आठवड्यात SPI महागाई (Inflation) 34.83 टक्के नोंदवली गेली. पाकिस्तान सरकारने नवीन कर लादल्याने आणि पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत झालेली वाढ यामुळे महागाईत ही वाढ झाली आहे. IMF कडून $1.1 अब्ज मदत मिळण्याच्या अटीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे.

Pakistan Inflation
Pakistan: कराचीत पोलीस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला, प्रचंड गोळीबार; Video

गोष्टी खूप महाग

आठवडाभरात पेट्रोलचे (Petrol) दर 8.82 टक्के, एक किलो तूप 8.02 टक्के, कोंबडीच्या मांसात 7.49 टक्के आणि डिझेलच्या दरात 6.49 टक्के वाढ झाली आहे. साप्ताहिक आधारावर, टोमॅटोच्या किमतीत 14.27 टक्क्यांनी, त्यापाठोपाठ कांद्याच्या किमतीत 13.48 टक्क्यांनी, अंड्याच्या किमतीत 4.24 टक्क्यांनी, लसणाच्या किमतीत 2.1 टक्क्यांनी आणि मैद्याच्या किमतीत 0.1 टक्क्यांनी घसरण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com