Pakistan Security Forces Crackdown Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांची मोठी कारवाई; 35 दहशतवाद्यांचा खात्मा, 3 वरिष्ठ कमांडर अटकेत

Pakistan Security Forces Crackdown: पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी बलुचिस्तान प्रांतात एक मोठी लष्करी मोहीम राबवून दहशतवाद्यांचा खात्मा केला.

Manish Jadhav

Balochistan Military Operation: पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी बलुचिस्तान प्रांतात एक मोठी लष्करी मोहीम राबवून दहशतवाद्यांचा खात्मा केला. बलुचिस्तानमधील मंगला जरघून घर या दुर्गम भागात सुरक्षा दलांनी राबवलेल्या विशेष शोध मोहिमेदरम्यान 35 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. एवढचं नाहीतर तीन वरिष्ठ कमांडर्संना बेड्याही ठोकल्या. ही कारवाई 13 मे रोजी सुरु करण्यात आली होती. गेल्या चार दिवसांत सुरक्षा दलांनी सातत्याने केलेल्या कारवाईमुळे दहशतवादी संघटनांचे मोठे नुकसान झाले.

या मोठ्या कारवाईबाबत बलुचिस्तान सरकारच्या प्रवक्त्यांनी सविस्तर माहिती दिली. बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी रविवारी रात्री क्वेटा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना या मोहिमेची अधिकृत घोषणा केली. त्यांनी सांगितले की, ही लष्करी मोहीम प्रामुख्याने बंदी घातलेली दहशतवादी संघटना 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' आणि बलुचिस्तानमधील (Balochistan) त्यांच्या इतर सहकारी गटांविरुद्ध चालवण्यात आली होती. अटक करण्यात आलेले तिन्ही कमांडर हे हाय-प्रोफाइल दहशतवादी असून यापूर्वी ताब्यात घेतलेल्या इतर दहशतवाद्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारेच ही संपूर्ण मोहीम आखली गेली होती.

शाहिद रिंद यांनी पुढे माहिती दिली की, सुरक्षा दलांच्या या धडक कारवाईत मंगला जरघून घर परिसरातील दहशतवाद्यांचे अनेक मुख्य बेस कॅम्प आणि तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले. या मोहिमेबाबत पाकिस्तानी सैन्याकडून (आयएसपीआर) अद्याप कोणतेही स्वतंत्र अधिकृत वक्तव्य समोर आलेले नसले, तरी रिंद यांनी स्पष्ट केले की प्रांतातून मिळणाऱ्या गुप्त माहितीच्या आधारे अशा कारवाया पुढेही सुरु राहतील आणि बलुचिस्तानमधून दहशतवाद पूर्णपणे नष्ट करणे हाच या मोहिमांचा मुख्य उद्देश आहे.

पाकिस्तानकडून (Pakistan) झालेली ही मोठी कारवाई अशा वेळी समोर आली, जेव्हा अवघ्या काही दिवसांपूर्वीच बलुचिस्तानच्या बारखान जिल्ह्यात दहशतवाद्यांविरुद्ध लढताना एका मेजरसह पाच सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशंसच्या माहितीनुसार, त्या चकमकीत सुरक्षा दलांनी किमान सात दहशतवाद्यांना मारले होते, परंतु सैन्याचेही मोठे नुकसान झाले होते.

खरे तर, पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आणि त्यांना पोसल्याचा आरोप होत आला आहे. जागतिक स्तरावर यावरुन अनेकदा पाकिस्तानची कोंडी झाली. अशा परिस्थितीत, बलुचिस्तानसारख्या अशांत प्रांतात स्वतःच दहशतवाद्यांविरोधात इतकी मोठी आणि आक्रमक कारवाई करुन पाकिस्तान जागतिक स्तरावर आपली डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder Case: घरगुती वादातून काकाचा खून अन् आयुष्याची झाली माती! 29 वर्षाच्या दोषी पुतण्याला कोर्टाचा दणका; ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

Goa Formula Racing Scam: वीजबिलांचा भार जनतेवर; मोपा येथे महाघोटाळा, सवलतींचा वर्षाव इव्हेंटवर, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनीही केला आरोप

Goa Politics: 'आरजी'चा फुटबॉल वीरेशच्या हाती; राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तडकाफडकी राज्य समित्या बरखास्त

Sanjil Kudchadkar Kidnapping Case: कोंब-मडगाव परिसरातील घटनेमुळे खळबळ; कौटुंबिक वादातून पॅथॉलॉजी लॅबचालकाचे अपहरण

Maharashtra FDA Action: तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडला दणका! गुटख्याची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींवर होणार कारवाई; एफडीए ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT