Pakistan Bus Caught Fire:  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Bus Caught Fire: धावत्या बसने घेतला पेट, 30 प्रवासी होरपळले; पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील घटना

7 जण गंभीर जखमी

गोमंतक ऑनलाईन टीम

Pakistan Bus Caught Fire: पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रविवारी सकाळी एक भीषण रस्ता अपघात झाला. येथे पिंडी भटियान शहरात धावत्या बसला आग लागून 30 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमध्ये 40 हून अधिक लोक प्रवास करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बसला आग लागली ती बस कराचीहून इस्लामाबादला जात होती. प्रवासात बसने पिकअप व्हॅनला धडक दिली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या व्हॅनमध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल भरण्यात आले होते. त्यामुळे या धडकेनंतर बसला आग लागली.

हा अपघात इतका भीषण होता की, यात ३० नागरीकांचा मृत्यू झाला आहे, तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

बसला लागलेली आग इतकी भीषण होती की, काही वेळातच संपूर्ण बसची राखरांगोळी झाली.

याआधी खैबर पख्तुनख्वाच्या उत्तर वझिरीस्तानच्या शॉवाल तहसीलमध्येही मोठी दुर्घटना घडली होती. येथे एका व्हॅनमध्ये स्फोट झाला, त्यात 11 मजुरांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात दोन मजूरही जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शव्वाल तहसीलमधील गुल मीरकोटजवळ हा स्फोट झाला. येथून लष्करी ताफा जात होता, त्यानंतर आयईडीचा स्फोट झाला, ज्यामध्ये निष्पाप मजूरही बळी पडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT