India Pakistan Trade | Pakistan Economic Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Products: पाकिस्तानच्या 'या' 10 वस्तूंची भारतात मोठी मागणी, जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Pakistan Products: पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट अधिकच गडद होत चालले आहे. पाकिस्तान दीर्घ काळापासून महागाईने त्रस्त आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट अधिकच गडद होत चालले आहे. दीर्घ काळापासून पाकिस्तान महागाईने त्रस्त आहे. पाकिस्तानातील जनता अन्नासाठी तडफडत असल्याची परिस्थिती आहे. देशात एलपीजी सिलिंडर 10 हजार रुपयांना विकला जात आहे. पाकिस्तानी रेल्वेकडेही काही दिवस पुरेल एवढाच इंधन साठा आहे.

दरम्यान, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला पाकिस्तान (Pakistan) अजूनही इतर देशांकडे हात पसरुन उभा आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, भारतातही (India) अशा काही गोष्टी पाकिस्तानमधून येतात, ज्या प्रत्येक घरात वापरल्या जातात. चला तर जाणून घेऊया या गोष्टींबद्दल...

पाकिस्तानातील ड्रायफ्रुट्स आणि फळे प्रसिद्ध आहेत

सुका मेवा आणि फळांच्या बाबतीत पाकिस्तान अनेक देशांच्या पुढे आहे. पाकिस्तानच्या सुक्या मेव्याला अनेक देशांमध्ये चांगली मागणी आहे. भारताने 2017 मध्ये $488.5 दशलक्ष किमतीच्या पाकिस्तानी वस्तूंची आयात केली होती. तेव्हा भारताने पाकिस्तानातून ड्रायफ्रूट्स, टरबूजांसह अनेक प्रकारची फळे आयात केली होती. पाकिस्तानात चांगल्या दर्जाच्या फळांची मोठी बाजारपेठ (Market) आहे.

रॉक सॉल्ट आणि सिमेंट

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बिनानी सिमेंटचे उत्पादन पाकिस्तानमध्ये केले जाते आणि त्याला भारतात चांगली मागणी आहे. पाकिस्तानातील मीठ, सल्फर, दगड आणि चुना यांनाही भारतात चांगली मागणी आहे. उपवासाच्या वेळी प्रत्येक घरात वापरले जाणारे रॉक सॉल्ट पाकिस्तानमधून येते. पाकिस्तानची मुलतानी माती जगभर प्रसिद्ध आहे. चष्म्यांचे ऑप्टिकल्सही पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात आणले जातात. पाकिस्तानातूनही चामड्याची उत्पादने भारतात येतात.

पाकिस्तानी कापसाला भारतातही चांगली मागणी

पाकिस्तानी कापसाला भारतातही चांगली मागणी आहे. पाकिस्तानही भारताला स्टील आणि तांबे मोठ्या प्रमाणात विकतो. नॉन ऑरगॅनिक केमिकल्स, मेटल कंपाऊंड्सही पाकिस्तानमधून येतात. साखरेपासून बनवलेले मिठाईचे पदार्थही आयात केले जातात. लाहोर कुर्ता आणि पेशावरी चप्पल यांनाही भारतात चांगली मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माटोळी विक्रेत्यांना 'सोपो' माफ, परप्रांतीय होलसेल विक्रेत्यांवर कठोर कारवाई; मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

CM Pramod Sawant: 'आमच्या मंत्रिमंडळात तीन ओबीसी मंत्री...', राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री सावंतांचं वक्तव्य

Goa Assembly Session: गोव्यात लवकरच सहकारी संस्थांसाठी ‘नवा कायदा’ , महाराष्ट्रातील MOFAच्या धर्तीवर सावंत सरकारचा मोठा निर्णय!

धूम्रपान करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! स्लिप डिस्कचा वाढला धोका, संशोधनातून धक्कादायक खुलासा; जाणून घ्या लक्षणे आणि तज्ञांचा सल्ला

ऐन चतुर्थीच्या तोंडावर असोला नारळ महागला, लोकांमध्ये चिंता; Watch Video

SCROLL FOR NEXT