Pakistan Prime Minister Imran Khan appeals Bill Gates for Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणिस्तानच्या मदतीसाठी इम्रान खान यांची थेट बिल गेट्स यांना साद

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्यापासून इम्रान खान (Imran Khan) सतत अफगाणिस्तानच्या मदतीसाठी हाक देत आहेत.

दैनिक गोमन्तक

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सत्ता स्थापन केल्यापासून पाकिस्तानचे पंतप्रधान (Pakistan Prime Minister) इम्रान खान (Imran Khan) सतत अफगाणिस्तानच्या मदतीसाठी हाक देत आहेत. अशातच इम्रान खान यांनी अफगाणिस्तानसाठी आता मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) संस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्सयांनाच (Bill Gates) मदत मागितली आहे. अफगाणिस्तानला मानवतावादी मदत देण्यासाठी इम्रानने ही मदत मागितली आहे. 15 ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी काबूल ताब्यात घेतला आणि तेव्हापासून देशाला मदतीची नितांत गरज असल्याचे समजते आहे. (Pakistan Prime Minister Imran Khan appeals Bill Gates for Afghanistan)

काही वृत्तवाहिनींना मिळालेल्या माहितीनुसार इम्रानने बिल गेट्स यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. बिल गेट्स सध्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे सह-अध्यक्ष आहेत. यादरम्यान इम्रान यांनी पोलिओ निर्मूलनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर देखील चर्चा केली असल्याचे समजत आहे . यासोबतच, त्यांनी पाकिस्तानमधील पोषण परिस्थिती सुधारणे आणि फाउंडेशनकडून आर्थिक सेवांसाठी सुरू असलेल्या मदतीबद्दलही चर्चा केली आहे . इम्रानच्या कार्यालयाने या चर्चेसंदर्भात एक निवेदन जारी केले आहे.

पाकिस्तानच्या जिओ टीव्हीनुसार, 5 ऑक्टोबर रोजी दूरध्वनीवर संभाषण करताना, पंतप्रधान इम्रान खान यांनी बिल गेट्स यांना सांगितले की युद्धग्रस्त देश अफगाणिस्तानमधील निम्म्याहून अधिक लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली जगत आहे. त्यांना आर्थिक मदतीची खूप गरज आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, इम्रानने अफगाणिस्तानच्या आरोग्य व्यवस्थेवर जोर दिला आहे. त्याच वेळी, त्यांचा असा विश्वास आहे की पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसह संपूर्ण जगात अजूनही पोलिओचा धोका आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अलीकडेच एका मुलाखतीत , ' अफगाणिस्तानमध्ये शांतता आणि स्थिरतेसाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे तालिबानशी चर्चा. तसंच, तालिबानशी बोलणी हा महिलांच्या हक्कांसाठी आणि सरकारला खास पद्धतीने चालवण्याचा एकमेव पर्याय आहे.' असे सांगितले होते त्याचबरोबर

तालिबानला थोडा वेळ देण्याची गरज होती. त्याचबरोबर ते हेही सांगायला विसरले नाहीत की जर तालिबानला मदत मिळाली नाही तर अशांततेची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच इम्रान खान यांनी 'तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे आणि आता त्यांना इथल्या सरकारसोबतच जावे लागेल आणि सर्व गटांना सोबत घ्यावे लागेल. 40 वर्षांनंतर आता अफगाणिस्तानात शांतता असू शकते.' अशी आशा व्यक्त केली होती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Bangkok Shooting: कंबोडियासोबत युद्ध सुरु असतानाच थायलंडच्या बँकॉकमध्ये गोळीबार; 6 जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वतःलाही संपवलं Watch Video

Asia Cup 2025: आशिया कपपूर्वी मोठी घोषणा! 13 हजार धावा करणारा दिग्गज बनला मुख्य प्रशिक्षक

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT