तालिबान्यांना मदत करणाऱ्या ISI चीफची पाकिस्तानने केली हकालपट्टी

आता जनरल नदीम अंजुम (General Nadeem Anjum) आयएसआयचे नवे प्रमुख असणार आहेत.
General Faiz Hameed
General Faiz HameedDainik Gomantak
Published on
Updated on

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) अशरफ घनी (Ashraf Ghani) यांचे लोकशाही पध्दतीचे सरकार उलथवून लावत तालिबान्यांनी (Taliban) आपली सत्ता स्थापन केली आहे. विशेष म्हणजे तालिबान्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी पाकिस्ताने सहकार्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे. याच पाश्वभूमीवर पाकिस्तानच्या (Pakistan) गुप्तचर संस्थेचे प्रमुख जनरल फैज हमीद (General Faiz Hameed), ज्यांनी तालिबानला अफगाणिस्तानात सत्ता स्थापन करण्यास मदत केली, त्यांना आता पदावरुन हटविण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स म्हणजेच ISI ची प्रमुख फैज गेल्या महिन्यात लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा (General Kamar Javed Bajwa) यांची परवानगी न घेता काबूलला गेले होते. तथापि, तालिबान नेत्यांसह सेरेना हॉटेलमध्ये टी-पार्टीला हजेरीही लावली होती. तालिबानी नेत्यांना अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन करण्यास मदत केल्याचा त्यांच्यावर आरोपही करण्यात आला होता. जनरल फैज यांना इम्रान खान यांनी पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे पुढच्या वर्षी ते लष्करप्रमुख बनणार होते. असे म्हटले जाते की, जनरल बाजवा व्यतिरिक्त अमेरिका देखील त्यांच्या काबूल भेटीमुळे खूप चिडला होता. आता जनरल नदीम अंजुम (General Nadeem Anjum) आयएसआयचे नवे प्रमुख असणार आहेत.

बराच काळ तणावाचे वातावरण

जनरल हमीद यांना हटवण्याच्या बातम्या बराच काळ पाकिस्तानच्या राजकिय वातावरणात तरंगत होत्या, परंतु लष्कराच्या वर्चस्वामुळे पाकिस्तानचे मुख्य माध्यम हे अहवाल दडपून टाकत होते. हमीद यांना पेशावर कोर कमांडरचे प्रमुख म्हणून पाठवण्यात आले आहे. लष्करप्रमुखांनी उच्च स्तरावरही काही बदल केले आहेत.

हे देखील सत्य आहे की, जनरल हमीद आणि बाजवा यांच्यातील वादाच्या बातम्या बऱ्याच काळापासून सुरु होत्या. असे मानले जाते की, रावळपिंडीतील लष्करी गृहनिर्माण प्रकल्पावरुन दोघांमध्ये तीन वर्षांपूर्वी मतभेद सुरु झाले होते नंतर, जेव्हा इम्रान खान यांनी बाजवा यांना तीन वर्षांची मुदतवाढ दिली, तेव्हा त्यांच्यातील अंतर्गत वाद देशासमोर उघड झाले होते. फैज यांनी बाजवा यांना विश्वासात न घेता अनेक वेळा निर्णय घेणे सुरु केले होते.

General Faiz Hameed
Kabul Blast: अफगाणिस्तान हादरलं, 12 जणांचा मृत्यू

इम्रान यांना ठरवायचे होते, पण...

पंतप्रधानांना डीजी आयएसआय नेमण्याचा विशेषाधिकार आहे, अर्थात इम्रान यांनी फैज यांना डीजी आयएसआय बनवून त्यांना काढूनही टाकले होते. विशेष म्हणजे पंतप्रधान हा निर्णय लष्करप्रमुखांच्या सल्ल्याने घेतात. त्यामुळे असे म्हणता येईल की, जनरल हमीद यांना बाजवा यांच्या सल्ल्याने काढून टाकण्यात आले. मात्र, इम्रान खान फैज यांना हटवण्याच्या बाजूने नव्हते.

पाकिस्तानच्या काही पत्रकारांचा असा विश्वास आहे की, या प्रकरणात एक अमेरिकेचा हात असल्याचा देखील सांगण्यात येत आहे. खरं तर, फैज यांची काबूल भेट आणि तालिबान नेत्यांशी भेट ही बायडन प्रशासनासाठी धक्कादायक बाब होती. विशेष म्हणजे जनरल फैज तालिबान नेत्यांसह अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या पराभवाचा आनंद साजरा करत आहेत.

General Faiz Hameed
Taliban कब्जानंतर अफगाणिस्तान क्रिकेट संघ बांग्लादेशमध्ये दाखल

हमीद कसे अडकले?

15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबुलसह जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला. जगाला आधीच संशय होता की पाकिस्तान लष्कर आणि आयएसआय तालिबानला सर्व प्रकारे मदत करत आहेत. सप्टेंबरच्या सुरुवातीला, जनरल फैज हमीद तालिबान्यांना मदत करण्यासाठी काबुलमध्ये आले असल्याचे सांगण्यात येत होते.अफगाणिस्तानमधील पंचतारांकित हॉटेल सेरेनामध्ये फैज यांनी तालिबान्यांची भेट घेतली होती. योगायोगाने ब्रिटनमधील एक महिला पत्रकारही या हॉटेलमध्ये उपस्थित होती. त्यांनी केवळ फैज यांचे फोटो काढले नाहीत तर त्यांना प्रश्नही विचारले. त्यावेळी प्रत्युत्तरादाखल फैज फक्त ऑल इज वेल असे म्हणाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com