pakistan pm shehbaz sharif  Dainik Gomanak
ग्लोबल

Iran US Ceasefire: पाकड्यांची 'इंटरनॅशनल' फजिती! कॉपी-पेस्ट मेसेजवरुन शाहबाज शरीफ ट्रोल; इराण-अमेरिका शस्त्रसंधीचं क्रेडिट घेण्याची धडपड

Pakistan PM Copy Paste Tweet Controversy: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव निवळण्यासाठी मध्यस्थीचा आव आणणारे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सध्या एका विचित्र कारणामुळे सोशल मीडियावर थट्टेचा विषय ठरले.

Manish Jadhav

Shehbaz Sharif Trolled for Draft Message on X: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव निवळण्यासाठी मध्यस्थीचा आव आणणारे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सध्या एका विचित्र कारणामुळे सोशल मीडियावर थट्टेचा विषय ठरले. इराण-अमेरिका शस्त्रसंधीबाबत 'एक्स' वर पोस्ट करताना शरीफ यांनी चक्क 'कॉपी-पेस्ट' केलेली ड्राफ्ट मेसेजची फाईल तशीच पोस्ट केली, ज्यामुळे त्यांची जगभर नामुष्की झाली. "ड्रामेबाजी करण्याच्या नादात स्वतःची पोलखोल करुन घेणे" म्हणजे काय असते, याचा प्रत्यय या घटनेने दिला.

झाले असे की, शाहबाज शरीफ यांच्या अधिकृत 'एक्स' अकाऊंटवरुन एक पोस्ट करण्यात आली. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणवरील हल्ल्याची डेडलाईन दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्याचे आवाहन करण्यात आले होते, जेणेकरुन मुत्सद्देगिरीला वाव मिळेल. मात्र, ही पोस्ट करताना त्याच्या सुरुवातीलाच "Draft – Pakistan’s PM Message on X" असे लिहिलेले होते.

याचा अर्थ असा की, शरीफ यांना हा मेसेज बाहेरुन (संभवतः अमेरिका किंवा इस्रायलकडून) तयार करुन देण्यात आला होता आणि त्यांच्या टीमने तो जसाच्या तसा कॉपी करुन पोस्ट केला. काही वेळातच ही चूक लक्षात येताच पोस्ट डिलीट करण्यात आली आणि पुन्हा नवीन पोस्ट करण्यात आली, पण तोपर्यंत जागरुक नेटकऱ्यांनी याचे स्क्रीनशॉट काढून शरीफ यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.

प्रसिद्ध पत्रकार रायन ग्रिम यांनी यावर सवाल उपस्थित केला की, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची स्वतःची टीम स्वतःच्याच नेत्याला "Pakistan's PM" असे लिहून ड्राफ्ट का देईल? हा मेसेज पाकिस्तानबाहेरुन (Pakistan) ड्राफ्ट करण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. इतकेच नाही, तर या मेसेजमधील भाषा आणि शैली ही पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या नेहमीच्या शैलीशी जुळत नसल्याचेही अनेकांनी निदर्शनास आणून दिले. या गंभीर चुकीवर पंतप्रधान कार्यालयाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

दुसरीकडे, या फजितीनंतरही शाहबाज शरीफ आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना 'नोबेल शांतता पुरस्काराचे' वेध लागले आहेत. आपण इराण आणि अमेरिकेत शस्त्रसंधी घडवून आणली, असा दावा करत त्यांनी आपल्या समर्थकांमार्फत नोबेलची मागणी लावून धरली. 'कराची चेंबर ऑफ कॉमर्स' सारख्या संस्थांकडून तशा मागण्या करवून घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे, याआधी याच जोडीने डोनाल्ड ट्रम्प यांना 8 युद्धे थांबवल्याबद्दल नोबेल देण्याची शिफारस केली होती, आता ते स्वतःसाठीच हा मान मागत आहेत.

दरम्यान, 10 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या इराण-अमेरिका शांतता चर्चेसाठी पाकिस्तानने जय्यत तयारी केली असून शहरात दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, एकीकडे लेबनॉनवर इस्रायलने केलेल्या भीषण हल्ल्यामुळे इराण (Iran) भडकला असताना आणि अमेरिकेने इराणच्या अटी धुडकावून लावल्या असताना पाकिस्तानची ही 'मुत्सद्देगिरी' आणि 'नोबेलची स्वप्ने' हवेत विरणार की काय, अशी चिन्हे दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT