भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याचा बदला 'ऑपरेशन सिंदूर' राबवत घेतला. भारताने पुन्हा पाकिस्तानात घुसून धडक कारवाई केली. याआगोदर भारताने बालाकोट एअर स्ट्राईक करत पाकड्यांची जिरवली होती. याचदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शरीफ कबुली देताना दिसत आहेत. शरीफ यांच्या मते, जेव्हा भारताकडून युद्धबंदीचा प्रस्ताव आला तेव्हा ते अंघोळ करत होते. पाकिस्तान मेमोरियलमधील एका कार्यक्रमाला संबोधित करत असताना त्यांनी हे सांगितले.
दरम्यान, 10 मे रोजी भारतीय लष्कराने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करत नूर खान एअरबेस आणि इतर ठिकाणी हल्ला केले. शरीफ म्हणाले की, '10 मे रोजी पहाटे अडीच वाजता जनरल सय्यद असीम मुनीर यांनी मला हॉट लाईनवरुन कॉल करुन माहिती दिली की भारताने नूर खान एअरबेस आणि इतर भागांवर हल्ला केला आहे.' भारतीय हवाई दलाने आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला तर पाकिस्तानने चिनी तंत्रज्ञानाचा वापर केला.
शरीफ पुढे म्हणाले की, 'नमाजनंतर अंघोळ करण्यासाठी जाताना मी फोनही घेऊन गेलो होतो. तेव्हा दुसऱ्यांदा फोन वाजला. जनरल मुनीर लाईनवर होते. त्यांनी मला सांगितले की पाकिस्ताननेही प्रत्युत्तरादाखल कारवाई केली आहे. एवढचं नाहीतर भारत युद्धबंदीसाठी तयार झाला आहे.' मात्र मुनीर हे सांगायला विसरले की भारताने पाकिस्तानने डागलेली सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केले.
पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी सांगितलेल्या किस्स्यावर सोशल मीडियावर चर्चांना उधान आले. एका पाकिस्तानी कंटेंट क्रिएटरने व्हिडिओ अपलोड करुन शाहबाज शरीफ यांना निशाण्यावर घेतले. शरीफ यांनी केलेल्या दाव्याची त्याने पोलखोल केली. त्याने म्हटले की, पाकिस्तानवर भारताकडून हल्ले होत होते तेव्हा आमचे पंतप्रधान अंघोळ करत होते. एवढच नाहीतर संसदेशी सल्लामसलत न करता युद्धबंदी स्वीकारण्याच्या शरीफ यांच्या निर्णयावरही त्याने प्रश्न उपस्थित केला. युद्धबंदीच्या घोषणेनंतरही भारताने पाकिस्तानच्या हवाई तळांवर हल्ले केल्याचेही तो पुढे म्हणाला.
भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले, ज्यामध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन सारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. भारताने (India) दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेपलीकडून गोळीबार केला, तसेच सीमावर्ती राज्यांमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल, भारतानेही हल्ले केले, ज्यामध्ये 11 पाकिस्तानी हवाई तळ, संपर्क केंद्रे आणि विमानतळांना लक्ष्य केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.