pakistan parliament mp shibli faraz dainik gomantak
ग्लोबल

आपण भारतासारखे का करु शकत नाही... पाकिस्तानच्या संसदेत भारतीय निवडणूकीचे तोंडभरुन कौतुक

Pakistan MP Shibli Faraz: पाकिस्तानच्या संसदेत भारताच्या निवडणूक प्रक्रियेचे तोंडभरुन कौतुक करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते शिबली फराज यांनी पाकिस्तानला भारताकडून शिकण्याचा सल्ला दिला.

Manish Jadhav

Indian Elections: देशात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पाडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित एनडीएने पुन्हा एकदा बाजी मारत सत्ता मिळवली. मात्र भाजपचे स्वबळावर सत्ता मिळवण्याचे स्वप्न भंगले. मोदींच्या चेहऱ्यावर लढवलेल्या निवडणूकीत भाजपला केवळ 240 जागाच मिळवता आल्या.

देशात लोकशाही पद्धतीने पार पडलेल्या निवडणूकीचे देशासह जगभरात कौतुक होत आहे. कौतुक करण्यामध्ये आपला शेजारील देश पाकिस्तानही मागे नाही. पाकिस्तानच्या संसदेत भारताच्या निवडणूक प्रक्रियेचे तोंडभरुन कौतुक करण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते शिबली फराज यांनी पाकिस्तानला भारताकडून शिकण्याचा सल्ला दिला. फराज म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीने इव्हीएमच्या सहाय्याने निवडणूक घेतली.

भारताच्या निवडणूक प्रक्रियेचे कौतुक करताना फराज म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीने ईव्हीएमसह दीर्घकाळ चालणारी निवडणूक घेतली. निकाल जाहीर झाले आणि कोणत्याही फसवणुकीच्या आरोपांशिवाय सुरळीतपणे सत्ता हस्तांतरित झाली. आपण ते का साध्य करु शकत नाही?

फराज पुढे म्हणाले की, मला शत्रू देशाचे उदाहरण द्यायचे नाही. परंतु तिथे नुकतीच निवडणूक झाली...निवडणूकीत गडबड झाली असं कुणी म्हटलं का? पाकिस्तान अशा मुक्त आणि निष्पक्ष निवडणूका का घेऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी विचारला. ते पुढे असेही म्हणाले की, भारतात 800 दशलक्षाहून अधिक लोकांनी मतदान केले. लाखो मतदान केंद्रे होती. एका ठिकाणी एका व्यक्तीसाठीही पोलिंग स्टेशन त्यांनी तयार केले होते. निवडणूक महिनाभर चालली. लोकांनी ईव्हीएमद्वारे मतदान केले. पण तिथे कुणीतरी आवाज उठवला का?. पण आपल्या देशातील व्यवस्था बघा ती खिळखिळी झाली आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या संसदेत भारताचे कौतुक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच, मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट पाकिस्तान (MQM-P) पक्षाचे नेते आणि पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य सय्यद मुस्तफा कमाल यांनी भारत आणि त्यांच्या देशाच्या (Pakistan) विकासाची तुलना केली होती.

ते म्हणाले होते की, जग चंद्रावर जात आहे, तर कराचीमध्ये एका मुलाचा उघड्या गटारात पडून मृत्यू होत आहे. त्याचवेळी, एकीकडे भारत चंद्रावर उतरल्याच्या बातम्या आल्या, तर दुसरीकडे कराचीत एका उघड्या गटारात पडून बालकाचा मृत्यू झाल्याच्याही बातम्या आल्या. दरम्यान, पाकिस्तानच्या संसदेत भारताच्या निवडणूक प्रक्रियेचे कौतुक करतानाचा फराज यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT