Lok Sabha Election 2024: ‘’शहजाद्याला PM बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा’’; व्होट जिहादवरुन मोदींनी काँग्रेसला पकडलं कोंडीत

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवारी) गुजरातमधील आणंद येथे निवडणूक रॅलीत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर दुसरीकडे भाजपला शिकस्त देण्यासाठी काँग्रेसप्रणित इंडिया अलायन्सने जोर लावला आहे. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

अशातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवारी) गुजरातमधील आणंद येथे निवडणूक रॅलीत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. आपल्या गृहराज्यातही पंतप्रधानांनी पाकिस्तानचे नाव घेऊन काँग्रेसला कोंडीत पकडले.

राहुल गांधींना निर्देशित करत पंतप्रधान म्हणाले की, ‘शाहजाद्याला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर आहे. काँग्रेसच्या पराभवामुळे पाकिस्तानला त्रास होत आहे.’ काँग्रेस मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ इच्छित असल्याचा घणाघात त्यांनी पुन्हा एकदा केला. काँग्रेस असे करणार नाही असे लेखी देण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

संविधान बदलून काँग्रेस मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देऊ इच्छिते, असा आरोप पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा केला. मुस्लिम व्होट बँकेवर इतर पक्षांच्या दाव्यानंतर काँग्रेसला हे करणे भाग पडले आहे, असेही ते पुढे म्हणाले. त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना तीन आव्हाने देत देशाला लेखी हमी देण्यास सांगितले.

PM Narendra Modi
Lok Sabha Election 2024: देश शरियानुसार चालणार का? काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरुन अमित शाह यांचा हल्लाबोल

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘’काँग्रेस आणि त्यांच्या संपूर्ण इको सिस्टमला मी आवाहन करतो की, संविधान बदलून मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही, अशी लेखी हमी काँग्रेसने देशाला द्यावी. माझे दुसरे आव्हान- एससी-एसटी आणि ओबीसींना दिलेल्या आरक्षणात काँग्रेस कोणताही अडथळा आणणार नाही, असे लेखी देशाला द्यावे. माझे तिसरे आव्हान आहे - काँग्रेसने देशाला पत्र लिहून हमी द्यावी की ज्या राज्यांमध्ये काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष सत्तेत आहेत ते कधीही घाणेरडे व्होट बँकेचे राजकारण करणार नाहीत. मागच्या दाराने ओबीसी कोटा कमी करुन मुस्लिमांना आरक्षण देणार नाही. शाहजादे हिंमत असेल तर समोर या.... संविधान संविधान म्हणून काही होत नाही त्याच्यासाठी जगायला आणि मरायला शिकायचं असेल तर मोदींकडे या....’’

PM Narendra Modi
Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाने 75 वर्षांच्या इतिहासात वसूल केला सर्वाधिक अवैध पैसा; मतदानापूर्वीच 4650 कोटी रुपये जप्त

व्होट जिहादचा नारा दिला: पंतप्रधान मोदी

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांची भाची मारिया आलम खान यांनी दिलेल्या व्होट जिहादवरील विधानावरही पंतप्रधान मोदींनी पलटवार केला. हे देशासाठी धोकादायक असल्याचे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘’इंडिया अलायन्सचा आणखी एक पर्दाफाश त्यांच्याच एका नेत्याने देशासमोर केला आहे. मुस्लिमांना व्होट जिहाद करण्याचे आवाहन त्यांनी केले. लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता व्होट जिहाद ऐकतो आहे. तेही सुशिक्षित मुस्लिम कुटुंबातून आलेले लोक अशाप्रकारची वक्तव्य करतायेत.

काँग्रेस पक्षात वरिष्ठ पदावर असलेल्या नेत्याच्या भाचीने व्होट जिहादचा नारा दिला. जिहाद म्हणजे काय आणि तो कोणाच्या विरोधात केला जातो हे तुम्हाला चांगलचं माहीत आहे. सर्व मुस्लिमांनी एकजुटीने मतदान करावे, असे इंडिया अलायन्सचे स्पष्ट म्हणणे आहे. इंडिया अलायन्सने व्होट जिहादविषयी वक्तव्य करुन लोकशाही आणि संविधानाचा अपमान केला आहे. काँग्रेसच्या एकाही नेत्याने त्याला विरोध केला नाही.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com