Operation Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: पाकिस्तानातील गरिबांचे जगणे झाले कठीण, तस्कर पैशासांठी 1 कोटी रुपयांना विकतायेत किडनी!

Pakistan: सध्या पाकिस्तान आर्थिक संकटाशी झुंजत आहे, त्यामुळे तेथील लोक उपासमारीला सामोरे जात आहेत.

Manish Jadhav

Pakistan: सध्या पाकिस्तान आर्थिक संकटाशी झुंजत आहे, त्यामुळे तेथील लोक उपासमारीला सामोरे जात आहेत. परिस्थिती इतकी बिकट आहे की, लोकांना आपली किडनी विकावी लागत आहे.

एकीकडे लोकांकडे पैसे नाहीत, तर दुसरीकडे, गरिबांच्या असहायतेचा फायदा तस्कर घेत आहेत. पाकिस्तानमध्ये (Pakistan) तस्कर पैशासाठी गरिबांची किडनी विकत आहेत.

किडनी करोडोंना विकली जात आहेत

पाकिस्तानातील तस्कर कसाई बनले आहेत. गरिबीचा फायदा घेत त्यांनी आतापर्यंत 328 जणांची किडनी काढली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एक किडनी सुमारे एक कोटी रुपयांना विकली जात आहे. पोलिसांनी (Police) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, तस्कर इथल्या गरिबांची किडनी काढून परदेशात विकत आहेत, जिथे त्यांना प्रत्येक किडनीमागे 30 लाख ते 1 कोटी रुपये मिळतात.

तस्कर टोळीतील आठ जणांना अटक

तस्कर टोळीचा म्होरक्या फवाद मुख्तारवर 300 हून अधिक किडनी काढल्याचा आरोप आहे. मात्र, पोलिसांनी फवादला यापूर्वी पाचवेळा अटक केली होती, मात्र प्रत्येक वेळी तो जामीन मिळवण्यात यशस्वी झाला. सध्या या टोळीतील आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

चौकशीत, तस्करांनी सांगितले की, ते श्रीमंतांना किडनी विकायचे आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून मोठी रक्कम घेत.

पूर्व पंजाब प्रांताव्यतिरिक्त पीओकेमध्येही तस्करी करणारी टोळी सक्रिय असल्याचे सांगण्यात आले. किडनी काढल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

लोकांना किडनी काढण्याबाबत माहिती देण्यात आली नाही

या प्रकरणी पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री मोहसिन नक्वी म्हणाले की, लोकांच्या गरिबीचा फायदा घेत तस्कर किडनी काढत आहेत. लोकांना किडनी काढण्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

तस्कर टोळीच्या या गुन्ह्यात एका मेकॅनिकचाही सहभाग आहे, जो दवाखान्यात जाऊन लोकांना वेठीस धरायचा. ही पहिलीच वेळ नाही, याआधीही जानेवारी महिन्यात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाची किडनी काढल्याचा आरोप असलेल्या तस्कर टोळीला पकडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT