Pakistan: भीक मागण्यासाठी सौदीला जाणाऱ्या 16 पाकिस्तानींना फ्लाइटमधून उतरवले, यात्रेकरुंच्या वेशात...

Pakistan Beggars: पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. याचे जिवंत उदाहरण सौदी अरेबियाला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये पाहायला मिळाले.
Pakistan Beggars
Pakistan BeggarsDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Beggars: पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. याचे जिवंत उदाहरण सौदी अरेबियाला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये पाहायला मिळाले. या फ्लाइटमध्ये पाकिस्तानातील 16 भिकारी पकडले गेले आहेत.

ज्यांना यात्रेकरुंच्या वेशात सौदी अरेबियाला पोहोचायचे होते. या सर्वांची ओळख पटवून त्यांना विमानातून बाहेर काढण्यात आले.

फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) दोन दिवसांपूर्वी मुलतान विमानतळावर ही कारवाई केली. हे सर्वजण सौदी अरेबियाला जाणाऱ्या उमराह यात्रेकरुंच्या वेशात आले होते.

एफआयएच्या म्हणण्यानुसार, या गटात एक लहान मूल, 11 महिला आणि चार पुरुषांसह 16 लोकांचा समावेश होता, जे उमराह व्हिसावर प्रवास करत होते.

इमिग्रेशन प्रक्रियेदरम्यान, एफआयए अधिकाऱ्यांनी प्रवाशांची चौकशी केली ज्यांनी कबूल केले की, ते केएसएमध्ये भीक मागण्यासाठी जात आहेत.

दरम्यान, भीक मागून मिळणाऱ्या कमाईचा अर्धा भाग त्यांना प्रवासासाठी व्यवस्था करणाऱ्या एजंटांना द्यावा लागतो, असेही त्यांनी उघड केले. उमराह व्हिसाची मुदत संपल्यानंतर त्यांना पाकिस्तानला (Pakistan) परतायचे होते. FIA मुलतान सर्कलने पुढील चौकशी आणि कायदेशीर कारवाईसाठी प्रवाशांना अटक केली.

Pakistan Beggars
Pakistan: बलुचिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट; 52 ठार, 50 जखमी

दुसरीकडे, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सिनेट समितीसमोर भिकाऱ्यांना बेकायदेशीरपणे भीक मागण्यासाठी परदेशात पाठवले जात असल्याचा खुलासा केल्याच्या एका दिवसानंतर ही अटक झाली आहे.

त्रालयाच्या सचिवांनी सिनेट पॅनेलला सांगितले होते की, परदेशात पकडलेल्या भिकाऱ्यांपैकी 90 टक्के पाकिस्तानचे आहेत. या अटकेमुळे इराकी आणि सौदी राजदूतांनी तुरुंगात गर्दी वाढल्याचे सांगितले आहे.

Pakistan Beggars
Pakistan: पाकिस्तान लष्कराचा तालिबानच्या तळावर छापा, गोळीबारात 3 दहशतवादी ठार

पाकिस्तानी भिकारी परदेशात कसे जातात?

सिनेट पॅनेलला दिलेल्या अहवालात परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव झुल्फिकार हैदर यांनी सांगितले की, सुमारे 30 लाख पाकिस्तानी सौदी अरेबियामध्ये, 15 लाख यूएईमध्ये आणि 2 लाख कतारमध्ये आहेत.

ते म्हणाले की, बहुतेक भिकारी सौदी अरेबिया (Saudi Arabia), इराण आणि इराकमध्ये जाण्यासाठी हज यात्रेसाठी जारी केलेल्या व्हिसाचा फायदा घेतात. तिथे पोहोचल्यावर ते भीक मागू लागतात.

पाकिस्तानी वृत्तपत्र 'द एक्सप्रेस ट्रिब्यून'ने हैदर यांच्या हवाल्याने लिहिले आहे की, मोठ्या संख्येने भिकारी पाकिस्तान सोडून जात आहेत.

हैदर यांनी पुढे असेही सांगितले की, मक्का मशिदीशिवाय अनेक धार्मिक स्थळांवरुन मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांना पकडण्यात आले आहे, ज्यामध्ये सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com