Pakistan: बलुचिस्तानमध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट; 52 ठार, 50 जखमी

Balochistan Blast News: बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यातील एका मशिदीजवळ शुक्रवारी झालेल्या आत्मघातकी स्फोटात एका पोलिस अधिकाऱ्यासह 52 जण ठार झाले.
Balochistan Blast News
Balochistan Blast NewsDainik Gomantak

Balochistan Blast News: बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यातील एका मशिदीजवळ शुक्रवारी झालेल्या आत्मघातकी स्फोटात एका पोलिस अधिकाऱ्यासह 52 जण ठार झाले, तर 50 हून अधिक जण जखमी झाले.

जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) अब्दुल रज्जाक शाही यांनी Dawn.com ला मृतांच्या संख्येची पुष्टी केली, तर सिटी स्टेशन हाऊस ऑफिसर (SHO) मोहम्मद जावेद लेहरी यांनी सांगितले की, मृतांमध्ये एक पोलीस अधिकारी देखील आहे.

शाही यांनी स्पष्ट केले की, दोन रुग्णालयांमधून (Hospital) दुहेरी नोंदी झाल्यामुळे ही संख्या जास्त आहे. जखमींची संख्या 50 आहे.

अहवालानुसार, यापूर्वी शहीद नवाब गौस बख्श रायसानी मेमोरियल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी डॉ. सईद मिरवानी यांनी सांगितले होते की, 34 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 130 हून अधिक जखमी झाले आहेत.

Balochistan Blast News
Pakistan: पाकिस्तान लष्कराचा तालिबानच्या तळावर छापा, गोळीबारात 3 दहशतवादी ठार

दरम्यान, सीईओ डॉ मिरवानी यांनी पुष्टी केली की, आतापर्यंत 28 मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत, तर सहा जणांना मस्तुंग जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे.

मिरवानी यांनी पुढे सांगितले की, डझनभर लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर 20 हून अधिक जखमींना वैद्यकीय मदतीसाठी क्वेटा येथे हालवण्यात आले आहे. मृतदेह आणि जखमींना रुग्णालयात पोहोचवण्याचे काम अजूनही सुरु आहे.

मस्तुंगचे सहाय्यक आयुक्त (एसी) अताहुल मुनीम यांनी सांगितले की, अल्फालाह रोडवरील मदिना मशिदीजवळ ईद मिलादुन नबी (पीबीयूएच) मिरवणुकीसाठी लोक जमत असताना हा स्फोट झाला. त्यांनी पुष्टी केली की, हा स्फोट डीएसपी गिश्कोरी यांच्या कारजवळ झाला.

हल्लेखोराने डीएसपींच्या गाडीजवळ स्वत:ला उडवले

एसएचओ लेहरी यांनी सांगितले की, हा स्फोट 'आत्मघाती स्फोट' होता आणि हल्लेखोराने डीएसपी गिश्कोरी यांच्या कारजवळ स्वत:ला उडवले. बलुचिस्तानचे (Balochistan) अंतरिम माहिती मंत्री जान अचकझाई यांनी सांगितले की, एक बचाव पथक मस्तुंगला पाठवण्यात आले आहे. ते म्हणाले की, गंभीर जखमींना क्वेट्टा येथे हलवण्यात येत आहे.

Balochistan Blast News
Russia-Pakistan: अखेर पाकिस्तानने रंग दाखवला! डॉलरच्या लालसेपोटी दिला चीन-रशियाला धोका

'शत्रूला धार्मिक सहिष्णुता आणि शांतता नष्ट करायची आहे'

अचकझाई म्हणाले, 'शत्रूला परकीय मदतीने बलुचिस्तानमधील धार्मिक सहिष्णुता आणि शांतता नष्ट करायची आहे, हा स्फोट असह्य होणारा आहे.' ते पुढे म्हणाले की, काळजीवाहू मुख्यमंत्री अली मर्दान डोमकी यांनी स्फोटासाठी जबाबदार असलेल्यांना अटक करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

पीटीआयचे नेते इम्रान इस्माईल यांनी या स्फोटाचा तीव्र शब्दात निषेध करत म्हटले की, 'जे निष्पाप लोकांना मारतात ते अत्याचारी आणि दहशतवादी आहेत.' कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणा लवकरच गुन्हेगारांना पकडतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Balochistan Blast News
Pakistan: झाडाला बांधून दगडाने ठेचले, दोन भावांच्या मदतीने नवऱ्याने बायकोला संपवले

मस्तुंगमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत

दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला याच जिल्ह्यात जमीयत उलेमा-ए-इस्लाम-फजल (JUI-F) नेता हाफिज हमदुल्लासह 11 जण स्फोटात जखमी झाले होते. त्याच्या आठवडाभरापूर्वी, एका लेव्ही अधिकाऱ्यावर बसस्थानकावर अज्ञातांनी गोळीबार केला होता, तर तेथून जाणारे दोघे जखमी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com