Pakistan Suicide Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Pakistan Khyber Pakhtunkhwa Suicide Attack: पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू आणि टँक जिल्ह्यांच्या सीमेवर एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला.

Manish Jadhav

Pakistan Khyber Pakhtunkhwa Suicide Attack: पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू आणि टँक जिल्ह्यांच्या सीमेवर एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला. बंडखोरांनी स्फोटकांनी भरलेली एक गाडी सुरक्षा दलांच्या चेक पोस्ट बाहेरील भिंतीला जोरदार धडकवली. या महाभयंकर स्फोटात 12 सैनिकांसह 15 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, यामध्ये 12 लष्करी जवान, 2 पोलीस कर्मचारी आणि वनविभागाच्या एका माजी सरकारी अधिकाऱ्याचा समावेश आहे. स्फोट इतका भयानक होता की, संपूर्ण चेक पोस्टची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

पाकिस्तान सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला शुक्रवारी संध्याकाळी घडला. गाडी धडकल्यानंतर झालेल्या भीषण स्फोटानंतर सुरक्षा दलांनी तातडीने सावध होत प्रत्युत्तराखल जोरदार गोळीबार केला. सैन्याने केलेल्या या कारवाईत 12 दहशतवाद्यांना जागीच कंठस्नान घालण्यात यश आले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने थेट घेतलेली नसली, तरी या भागात 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' (TTP) ही बंदी घातलेली दहशतवादी संघटना मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. गेल्या काही वर्षांत खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान भागात टीटीपीच्या हिंसक कारवाया आणि हल्ल्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

या भीषण घटनेनंतर पाकिस्तान (Pakistan) आणि अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारमधील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली. पाकिस्तानने यापूर्वीही आपल्या सीमावर्ती भागात होणाऱ्या अशा भीषण दहशतवादी हल्ल्यांसाठी अफगाणिस्तानच्या भूमीवरुन चालणाऱ्या दहशतवादाला जबाबदार धरले. मात्र, तालिबान सरकारने हे सर्व आरोप सातत्याने फेटाळून लावले. दोन्ही देशांमधील या वादांमुळे आधीच अनेकदा सशस्त्र चकमकी आणि हवाई हल्ले झाले. जून महिन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत केलेल्या हवाई हल्ल्यात अनेक नागरिक मारले गेले होते, असा दावा संयुक्त राष्ट्र आणि तालिबानने केला होता. या ताज्या हल्ल्यामुळे पाकिस्तानमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT