Pakistan flag  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: 'पाकिस्तान भिखारी नाही, आयएमएफचा सदस्य आहे'- वित्तीयमंत्र्याचे खळबळजनक व्यक्तव्य

Pakistan: या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने आयएमएफकडे मदत मागितली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Pakistan: गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परकीय गंगाजळीच्या कमतरतेमुळे महागाईने उच्चांक गाठला असून रोजच्या जीवनावश्यक बाबींसाठीदेखील नाागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

आता पाकिस्तानचे वित्तियमंत्री इशाक डार यांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान मोठे विधान केले आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मॉनेटरी फंडचा सदस्य आहे भिखारी नाही असे इशाक डार यांनी म्हटले आहे.

  • पाकिस्तान भिखारी नाही, आयएमएफचा सदस्य आहे असे इशाक डार यांनी का म्हटले?

पाकिस्तान गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परकीय गंगाजळी कमी प्रमाणात असल्याने आवश्यक गोष्टी आयात करण्यासाठी पाकिस्तानला मोठी किंमत द्यावी लागत आहे. परिणामी महागाई वाढून सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.

या संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानने आयएमएफकडे मदत मागितली होती. मात्र सातत्याने मदत मागितल्यानंतर आय़एमएफने सगळ्या अटी पूर्ण झाल्यानंतरच पाकिस्तानला कर्ज मिळेल असे म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे वित्तिय मंत्री इशाक डार कर्जाविषयी चर्चा करण्यासाठी आयएमएफच्या अधिकाऱ्यांना भेटणार होते. मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी हा दौरा रद्द केला. त्यानंतर आयएमएफच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करण्यास नकार दिल्याने इशाक डार यांनी हा दौरा रद्द केला असे म्हटले जात होते.

यावर बोलताना या अफवा असून पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सांगण्यावरुन रद्द केल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान आयएमएफचा अधिकारी असून भिखारी नाही असेही त्यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी म्हटले आहे की, आयएमएफ मला स्प्रिंग मिटिंगमध्ये सामील होण्यापासून रोखू शकत नाही.

10 ते 16 एप्रिलपासून वॉंशिग्टनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड बॅंक आणि आयएमएफच्या स्प्रिंग मिटिंगमध्ये पाकिस्तान सामील होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

दरम्यान, आयएमएफकडून कर्ज मिळवण्यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करत आहे. 1.1अरब डॉलरसाठी आयएमएफकडून काही अटी पाकिस्तानसमोर ठेवल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी पाकिस्तान सरकराकडून एक मिनी बजेट तयार केले असून त्याद्वारे 200अरब जमा करण्याचे लक्ष समोर ठेवले आहे.

आता पाकिस्तानच्या वित्तमंत्र्यानी केलेल्या विधानानंतर आयएमएफकडून यावर काय प्रतिक्रिया दिली जाणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT