Terrorist Attack
Terrorist AttackDainik Gomantak

Video: तेल अवीवमध्ये दहशतवादी हल्ला, 3 ठार, 8 हून अधिक जखमी

Israel: इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
Published on

Israel: इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. तेल अवीवचे पोलीस प्रमुख अमिचाई एशेद यांनी सांगितले की, संशयित हल्लेखोराने सायकल लेनमध्ये वाहन घुसवले आणि अनेक पादचाऱ्यांना धडक दिली.

एशेद यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोलिस (Police) हल्लेखोराचा हेतू आणि पार्श्वभूमी तपासत आहेत. संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पंतप्रधान नेतन्याहू यांनी या घटनेची अपडेट घेतली आहे.

Terrorist Attack
Israel Airstrike: अल-अक्सा मशिदचा वाद पेटला? इस्रायलचा लेबनॉन-गाझा पट्टीवर हवाई हल्ला

दुसरीकडे, आसपासच्या भागात लष्कर तैनात करण्यात आले आहे. तेल अवीवच्या घटनेनंतर, नेतन्याहू यांनी दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी IDF कडून अधिक सुरक्षा दलांची जमवाजमव करण्याचे आदेश दिले. यासोबतच पंतप्रधानांनी नागरिकांना (Citizens) सुरक्षा दलांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले.

जाणून घ्या अल-अक्सा मशिद वाद?

इस्रायलमधील जेरुसलेममधील अल-अक्सा मशीद इस्लाम, यहुदी आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्मांसाठी पवित्र स्थान आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याशी संबंधित असल्यामुळे, ही मशिदी मक्का आणि मदिना नंतर इस्लाममधील तिसरी सर्वात पवित्र स्थळ मानली जाते.

अल-अक्सा मशीद, ज्याला अल-हरम-अल-शरीफ असेही म्हटले जाते, मुस्लिमांनी 35 एकर परिसरात बांधले आहे. ज्यूंसाठी सर्वात पवित्र स्थान 'डोम ऑफ द रॉक' देखील याच ठिकाणी आहे. ते त्याला टेम्पल टाऊन म्हणतात.

तसेच, ख्रिश्चनांचा असा विश्वास आहे की या ठिकाणी येशू ख्रिस्त वधस्तंभावर खिळले होते आणि ते येथेच पुन्हा प्रकट झाले. त्याच्या आत येशू ख्रिस्ताची समाधी देखील आहे. ख्रिश्चन त्याला चर्च ऑफ द होली सेपल्चर म्हणतात. तिन्ही धर्माचे अनुयायी या जागेवर आपला दावा करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com