Pakistan Economic Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानात महागाईने मोडला 48 वर्षांचा रेकॉर्ड

Inflation In Pakistan: आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानमध्ये चलनवाढीने नवा उच्चांक गाठला आहे.

दैनिक गोमन्तक

Inflation In Pakistan: आर्थिक संकटातून जात असलेल्या पाकिस्तानमध्ये चलनवाढीने नवा उच्चांक गाठला आहे.1975 नंतर चलनवाढीने विक्रमी पातळी गाठली आहे. अन्नधान्य, कच्चा माल आणि उपकरणे यांच्या तुटवड्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. डॉलरच्या तुटवड्यामुळे सरकारने आयात कमी केली आहे.

अन्नधान्याच्या किमतीतील अभूतपूर्व वाढीमुळे महागाई गगनाला भिडली आहे, ज्यामुळे जानेवारी 2023 मध्ये CPI महागाई 27.55 टक्क्यांपर्यंत वाढली. महिनाभरापूर्वी महागाई 24.47 टक्के होती.

महागाई शिगेला पोहोचली

मे 1975 मध्ये CPI महागाई 27.77 टक्के होती. पाकिस्तान सांख्यिकी ब्युरो (PBS) नुसार, जुलै-जानेवारी 2022/23 मध्ये सरासरी चलनवाढ 25.4 टक्के नोंदवली गेली होती, जी आर्थिक वर्ष 2022 च्या याच कालावधीत 10.26 टक्के होती. कोर महागाई देखील 2011 पासून सर्वोच्च पातळीवर राहिली. आगामी पतधोरण आढाव्यात स्टेट बँक ऑफ पाकिस्तान (SBP) मौद्रीक दर उच्च ठेवेल अशी अपेक्षा आहे.

तसेच, 23 जानेवारी रोजी, मध्यवर्ती बँकेने 100 बेसिस पॉइंट्सने पॉलिसी रेट 17 टक्क्यांपर्यंत वाढवला, जो 1998 नंतरचा उच्चांक आहे. आर्थिक संकटात वाढलेली महागाई आणि अपुरा पुरवठा ही समस्या बनली आहे. पीएमएल-एनच्या नेतृत्वाखालील 13 पक्षांचे आघाडी सरकार (Government) राजकीय भांडवल करत आहे. महागड्या बँक वित्तपुरवठामुळे त्याचा परिणाम सामान्य लोकांवरच नाही तर उद्योग आणि व्यवसायांवरही होत आहे.

दुसरीकडे,1957 ते 2023 पर्यंत पाकिस्तानमधील महागाईचा (Inflation) दर सरासरी 8.05 टक्के होता, डिसेंबर 1973 मध्ये तो 37.8 टक्क्यांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला. फेब्रुवारी 1959 मध्ये ते शून्यावरुन 10.32 टक्क्यांवर आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: "माझे घर" योजना सप्टेंबरपासून लागू - मुख्यमंत्री

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT