Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

PTI Banned in Pakistan: इम्रान खान यांच्या पक्षावर पाकिस्तानात घालण्यात येणार बंदी, शाहबाज सरकारचा मोठा निर्णय; देशविरोधी कारवाईचा आरोप

PTI Banned in Pakistan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत.

Manish Jadhav

PTI Banned in Pakistan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आता इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

पीटीआय हा पाकिस्तानातील सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी सोमवारी (15 जुलै) सांगितले की, सरकार देशविरोधी कारवायांच्या आरोपावरुन पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) वर बंदी घालणार आहे.

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्ला तरार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले की, कथित राष्ट्रविरोधी कारवायांसाठी पीटीआयवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, सरकार हे प्रकरण पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पाठवणार आहे.

पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) च्या नेतृत्वाखालील सरकारचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इम्रान खान यांच्या पक्षाला महिला आणि अल्पसंख्याकांसाठी राखीव असलेल्या 20 पेक्षा जास्त जागांसाठी पात्र घोषित केल्यानंतर आला आहे. यामुळे पीटीआयला नॅशनल असेंब्लीमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तर सत्ताधारी आघाडी दोन तृतीयांश बहुमत गमावण्याची शक्यता आहे.

कारवाईचा निर्णय का?

पीटीआयवर बंदी घालण्याच्या निर्णयाची घोषणा करताना मंत्री म्हणाले की, इम्रान खान यांच्या पक्षावर कारवाई करण्यासाठी सबळ पुरावे आमच्याकडे आहेत. ते पुढे म्हणाले की, "परकीय निधी प्रकरण, 9 मेची दंगल, सायफर एपिसोड आणि यूएसमध्ये मंजूर झालेला ठराव पाहता, पीटीआयवर बंदी घालण्यासाठी विश्वासार्ह पुरावे आहेत."

इम्रान खान यांनी कधी पक्षाची स्थापना केली होती?

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी 1996 मध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) ची स्थापना केली होती. इम्रान खान हे 2018 ते 2022 पर्यंत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. यानंतर इम्रान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती. इम्रान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात (Pakistan) प्रचंड खळबळ उडाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fraud: शेअर मार्केटमधून चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने 100 कोटी लाटले, आरोपी लंडनला फरार; पोलिसांची शोध मोहीम सुरु!

Kulem Gram Sabha: कुळे ग्रामसभा तापली! ऑडिट रिपोर्टवरुन ग्रामस्थांनी सरपंचांना घेरले; मार्केट कॉमप्लेक्सच्या मुद्यावरुन वादंग

Goa Live Updates: 130 कोटींचा घोटाळा उघड, सर्वांवर कारवाई होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली तंबी

Anjuna News: गोव्यात संगीत महोत्सवाचा वाद चिघळला, भर सभेत तरुणाला मारहाण; Video Viral

Goa Politics: ''महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला म्हणून गोव्यातील विरोधक...''; सरदेसाईंचा घणाघात

SCROLL FOR NEXT