Imran Khan: इम्रान खान यांना झटका; कोर्टाच्या 'या' निर्णामुळे तुरुंगातील वाढला आणखी मुक्काम

Former Pakistan PM Imran Khan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे.
Imran Khan: इम्रान खान यांना झटका; कोर्टाच्या 'या' निर्णामुळे तुरुंगातील वाढला आणखी मुक्काम
Former Pakistan Prime Minister Imran Khan & Bushra BibiDainik Gomantak

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. बेकायदेशीर निकाह प्रकरणात इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना सुनावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका जिल्हा न्यायालयाने गुरुवारी फेटाळली.

त्यामुळे इम्रान खान यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. याप्रकरणी 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या दाम्पत्याला सात वर्षांचा कारावास आणि प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान, हे प्रकरण सामान्यतः इद्दत केस म्हणून ओळखले जाते. इद्दत हा कालावधी आहे जो मुस्लीम स्त्रीने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर किंवा घटस्फोटानंतर पुनर्विवाह करण्यापूर्वी घालवला पाहिजे.

अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अफजल मजोका यांनी या प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर मंगळवारी निकाल राखून ठेवला होता.

न्यायाधीशांनी गुरुवारी निर्णय दिला की, जोडप्याने दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. या निर्णयामुळे रावळपिंडीच्या अडियाला तुरुंगात बंद असलेल्या खान दाम्पत्याच्या सुटकेच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे.

Imran Khan: इम्रान खान यांना झटका; कोर्टाच्या 'या' निर्णामुळे तुरुंगातील वाढला आणखी मुक्काम
Imran Khan: पाकिस्तानी कोर्टाचा इम्रान खान आणि बुशरा बीबी यांना दणका; नव्या प्रकरणात ठरवलं दोषी

इम्रान यांच्यावर अनेक गुन्हे दाखल

माजी पंतप्रधान खान (71) यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत तर त्यांची पत्नी बुशरा (49) यांच्यावरही अनेक गुन्हे दाखल आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये बुशरा बीबीच्या पहिल्या नवऱ्याने इम्रान खान यांच्यावर बेकायदेशीर निकाह खटला दाखल केला होता.

इद्दतचा अनिवार्य कालावधी पूर्ण न करता बुशरा बिबीने इम्राना यांच्याशी लग्न केल्याचा आरोप त्याने केला होता. त्याने इम्रान खान (Imran Khan) आणि बुशराचा विवाह रद्द करण्याचे आवाहन केले होते. खान आणि बुशरा बीबी यांचे 2018 मध्ये लग्न झाले. बुशरा बिबी ही इम्रान खान यांची तिसरी पत्नी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com