Pakistan PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

India Pakistan Tension: 'पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठार करु', राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर चवताळला पाकिस्तान; म्हणाला...

India Pakistan Tension: पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा भारताने खात्मा केल्याच्या बातमीने पुन्हा एकदा दोन्ही देशातील संबंधामध्ये कटूता येऊ शकते.

Manish Jadhav

India Pakistan Tension: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनलेल्या पाकिस्तानात लोक दोन वेळच्या अन्नासाठी संघर्ष करत आहे. मात्र दुसरीकडे, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या माध्यमातून पाकिस्तान सातत्याने दहशतवादी कारवाया करत आला आहे. यातच आता, पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा भारताने खात्मा केल्याच्या बातमीने पुन्हा एकदा दोन्ही देशातील संबंधामध्ये कटूता येऊ शकते. दोन दिवसांपूर्वी ब्रिटीश वृत्तपत्र द गार्डियनने यासंबंधीचे वृत्त दिले होते. त्यानंतर भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वेळ पडली तर पाकिस्तानात घुसून कारवाई करु असे म्हटले होते. याच पाश्वभूमीवर आता पाकिस्तानचीही प्रतिक्रिया आली आहे.

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेजारी देश पाकिस्तानमध्ये फोफावणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासंदर्भात दिलेल्या वक्तव्यावर पाकिस्तानने प्रतिक्रिया दिली. यातच, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करुन म्हटले की, भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी केलेल्या चिथावणीखोर टिप्पणीचा पाकिस्तान निषेध करतो. पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या वृत्ताशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी म्हटले होते की, देशाची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना भारत सरकार पाकिस्तानात लपून बसले असले तरी त्यांना सोडणार नाही. त्यांचाही हिशेब सरकार करेल.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह म्हणाले होते की, ''जर पाकिस्तानातील कोणत्याही दहशतवाद्याने भारताला डिवचण्याचा प्रयत्न किंवा भारतात दहशतवादी कारवाया केल्या तर आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देऊ. मग तो पाकिस्तानात पळून गेला तरी त्याला पाकिस्तानात घुसून ठार मारु.''

पाकिस्तानला हुलकावणी दिली

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यावर, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी एक निवेदन जारी करुन म्हटले की, "पाकिस्तानने 25 जानेवारी 2024 रोजी पाकिस्तानी भूमीवर आंतरराष्ट्रीय हत्येशी संबंधित भारतीय मिशनशी संबंधित पुरावे सादर केले होते. पाकिस्तानी नागरिकांना मनमानी पद्धतीने 'दहशतवादी' म्हणून लेबल देणे आणि शिक्षा देण्याचा दावा करणे हे चुकीचे आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला त्याच्या जघन्य आणि बेकायदेशीर कारवायांसाठी जबाबदार धरणे अत्यावश्यक आहे.''

दरम्यान, या निवेदनात पुढे असेही म्हटले की, ''पाकिस्तानने शांततेसाठी नेहमीच आपली वचनबद्धता दर्शवली आहे. तथापि, आपल्या शांततेच्या इच्छेचा गैरसमज होता कामा नये.''

वास्तविक, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ब्रिटिश वृत्तपत्र 'द गार्डियन'च्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली. वृत्तात दावा करण्यात आला की, भारताने पाकिस्तानमध्ये टारगेटेड किलिंग्स केल्या. वृत्तात पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी ISI च्या अधिकाऱ्यांचा हवाला देऊन दावा केला आहे की, भारताने ज्यांना शत्रू मानले त्यांची हत्या केली. 2019 च्या पुलवामा हल्ल्यापासून, भारतीय गुप्तचर संस्था RAW (Research and Analysis Wing) ने अशा किमान 20 जणांची हत्या केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT