पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री (Pakistan Foreign Minister ) यांनी पुन्हा एकदा भारताला (India) अनेक मुयद्द्यांवरून डिवचले आहे. याआधी देखील जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) मुद्द्यावरून अनेकवेळेस त्यांनी भारतावर टीका केली होती. तर आता पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी (Shah Mahmood Qureshi) यांनी हिंदुत्व (Hindutva) विचारसरणीवर टीका केली आहे . कुरेशी म्हणतात की या प्रदेशातील जागतिक सुरक्षेला सर्वात मोठा धोका भारत सरकारच्या हिंदुत्व विचारसरणीतून निर्माण झाला आहे.तर पाकिस्तान राष्ट्रीय आकांक्षा आणि जागतिक गतीशीलतेला संवेदनशील असलेले सक्रिय परराष्ट्र धोरण अवलंबत असल्याचेही त्यांनी सांगितले.(Pakistan foreign minister Shah Mahmood Qureshi statement on Hindutva)
नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी (NDU) मधील विद्यार्थ्यांना संबोधित करताना कुरेशी म्हणाले की, वेगाने बदलणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पाकिस्तानकडे पुरेसा अनुभव आहे.'प्रोफाइलिंग पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण आणि आव्हाने' या विषयावर कुरेशी बोलत होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी अनेक लष्करी अधिकारीही उपस्थित होते. याशिवाय या विद्यापीठाशी संबंधित अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कुरेशी म्हणाले की, दक्षिण आशियातील शाश्वत शांतता जम्मू-काश्मीर वादाच्या निराकरणावर अवलंबून आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर निकालासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही भारताची जबाबदारी असल्याचेही त्यांनी संगितिले आहे . ते म्हणाले की, 5 ऑगस्ट 2019 रोजी काश्मीर मुद्द्यावर बेकायदेशीर कारवाई केल्यानंतर, पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा जगभरात दृढनिश्चयाने उचलून धरला आणि भारताकडून जम्मू-काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे मत पाकिस्तानी गृहमंत्र्यांनी व्यक्त केले आहे.
कुरेशी पुढे म्हणाले की, भारताच्या चिथावणीला न जुमानता पाकिस्तानने नोव्हेंबर 2019 मध्ये करतारपूर कॉरिडॉर उघडण्यास सुरुवात केली. या प्रयत्नामुळे भारतातील आणि जगभरातील शीख समुदायाच्या लोकांना जगातील सर्वात पवित्र स्थळाला भेट देण्याची व्हिसामुक्त संधी मिळाली. ते पुढे म्हणाले की आमचे सर्व प्रयत्न हे पंतप्रधान इम्रान खान यांच्या व्हिजनची अभिव्यक्ती आहेत ज्यात शांततापूर्ण सहअस्तित्व, धार्मिक सौहार्द आणि विवादांचे शांततापूर्ण निराकरण समाविष्ट आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.