Pakistan PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: पाक च्या बुडत्या अर्थव्यवस्थेला 'या' देशाचा आधार! मोठ्या गुंतवणूकीचे दिले संकेत

UAE President Pakistan Visit: पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाने त्रस्त आहे. दरम्यान, संयुक्त अरब अमिराती (UAE) पाकिस्तानचे बुडणारे जहाज वाचवू शकते.

दैनिक गोमन्तक

UAE President Pakistan Visit: पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाने त्रस्त आहे. दरम्यान, संयुक्त अरब अमिराती (UAE) पाकिस्तानचे बुडणारे जहाज वाचवू शकते. UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान (Mohammed bin Zayed Al Nahyan) यांनी पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे संकेत दिले आहेत.

UAE सरकार पाकिस्तानमध्ये गुंतवणुकीची व्याप्ती वाढवण्याचा विचार करत आहे. पाकिस्तानची तिजोरी रिकामी आहे आणि यावेळी मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणुकीची गरज आहे. अशा परिस्थितीत UAE पाकिस्तानसाठी पुढे येऊ शकतो.

पाकिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक होऊ शकते

जिओ न्यूजनुसार, UAE चे अध्यक्ष झायेद अल नाहयान सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. सूत्रांनी अध्यक्ष झायेद अल नाहयानच्या हवाल्याने सांगितले की, तयार राहा, UAE पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करेल.

यूएई-पाकिस्तान संबंध अनेक दशके जुने आहेत

UAE चे अध्यक्ष झायेद अल नाहयान म्हणाले की, 'दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध खूप जुने आहेत. माझ्या वडिलांनी पाकिस्तान आणि UAE यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा पाया घातला.' राष्ट्राध्यक्ष झायेद अल नाहयान यांनी पंतप्रधान शहबाज शरीफ यांना आश्वासन दिले आहे की, UAE नेहमीच पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहील.

नाहयान-शहबाज यांच्या भेटीत उत्साह दिसून आला

सूत्रांनी सांगितले की, UAE चे अध्यक्ष झायेद अल नाहयान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यात खास भेट झाली. दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होण्याची अपेक्षा आहे.

विशेष म्हणजे, 12 जानेवारी रोजी UAE ने पाकिस्तानला $1 अब्ज कर्ज देण्याचे आणि सध्याचे $2 बिलियन कर्ज देण्याचे मान्य केले होते. यूएईनेही पाकिस्तानला काहीसा दिलासा दिला आहे. भीषण पुरामुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे पाकिस्तानचे 30 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT