Shehbaz Sharif  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan IMF Deal: दिवाळखोर पाकिस्तानला IMF ने दिला आणखी एक मोठा झटका, पॅकेज मिळवण्यासाठी...

Pakistan IMF Deal: पाकिस्तानच्या हतबलतेबद्दल कोणालाही वाईट वाटत नाही. ईदच्या दिवशीही पाकिस्तानला निराशेने घेरले आहे.

Manish Jadhav

Pakistan IMF Deal: पाकिस्तानच्या हतबलतेबद्दल आता कोणालाही वाईट वाटत नाही. ईदच्या दिवशीही पाकिस्तानला निराशेने घेरले आहे.

देशावर आर्थिक संकटाचे सावट आहे. पाकिस्तानला आयएमएफकडून मोठ्या अपेक्षा होत्या. नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालात दावा करण्यात आला आहे की, दोघांमधील करारात अनेक अडचणी आहेत.

पाकिस्तानी टीव्ही चॅनल एआरवाय न्यूजने वृत्त दिले आहे की, आयएमएफने पाकिस्तानला कर्जासाठी आणखी पावले उचलण्यास सांगितले आहे.

दरम्यान, आयएमएफनेही (IMF) पेट्रोलवरील अनुदानावर आक्षेप घेतला आहे. त्याचवेळी, दुसर्‍या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तान ईदनंतर सौदी अरेबियाशी दोन अब्ज डॉलर्सची अतिरिक्त ठेव मिळवण्यासाठी करार करु शकतो. सरकारी अधिकाऱ्यांनी शनिवारी ही माहिती दिली.

दुसरीकडे, या पावलामुळे पाकिस्तानला (Pakistan) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून मदत पॅकेज मिळण्यास मदत होईल, ज्याची त्याला सध्या खूप गरज आहे. मार्चमध्ये, पाकिस्तानने सौदी अरेबियाला IMF सोबत सेटलमेंटसाठी निधीची पुष्टी करण्याची विनंती केली होती.

IMF ने पाकिस्तानसमोर एक अट ठेवली की, सात अब्ज डॉलर्सचे मदत पॅकेज मिळवण्यासाठी आधी इतर देशांकडून तीन अब्ज डॉलर्स उभे करावे लागतील.

एका उच्च अधिकार्‍याने द न्यूज इंटरनॅशनलला सांगितले की, स्टेट बँक ऑफ पाकिस्तान सौदी फंड फॉर डेव्हलपमेंट (SFD) सोबत ईदनंतर लवकरच 2 अब्ज डॉलर्सच्या अतिरिक्त ठेवींसाठी करार करेल.

अहवालानुसार, अधिकाऱ्याने सांगितले की, सौदी अरेबियाने आयएमएफसोबत द्विपक्षीय सहकार्याची पुष्टी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT