Pakistan: खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; बैसाखीच्या मुहुर्तावर भारतीय...

Pakistan: अशा घोषणांनी पून्हा एकदा चिंतेत भर टाकली आहे.
 Pakistan flag
Pakistan flag Dainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan: पाकिस्तानमध्ये दरदिवशी काहीनाकाही अशा गोष्टी घडत असतात ज्याचा परिणाम काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय राजकारणावर होत असतो. आता पाकिस्तानच्या तळवंडी साबो मधील एका कॉलेजमध्ये खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा लिहल्याचे समोर आले आहे. माता साहिब कौर गर्ल कॉलेजच्या भींतीवर खलिस्तान जिंदाबाद अशा घोषणा लिहल्या आहेत.

इतकेच नाहीतर खालिस्तान SFJ चा झेंडादेखील लावण्यात आला आहे. नेमके बैसाखीच्याआधी अशा प्रकारच्या खलिस्तानच्या समर्थनार्थ अशा घोषणांनी पून्हा एकदा चिंतेत भर टाकली आहे. दरम्यान, सुरक्षेचा विचार करुन तळवंडी साबोमध्ये पोलिसांच्या नाकाबंदीसोबत पॅरामिलीटरी फोर्स तैनात केली आहे.

  • तलवंडी साबोचा इतिहास

तळवंडी साबो हे प्राचीन, प्रसिद्ध ऐतिहासिक नगर आहे. याचा इतिहास शीख समुदायाबरोबर जोडला आहे. गुरू बाबा नानकदेव यांचे हे जन्मस्थळ आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रसिद्ध ननकाना साहब गुरुद्वारा उभारण्यात आला आहे. त्यामुळे शीखधर्मीयांसाठी हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे.

बैसाखीच्या निमित्ताने येथे पार पडणाऱ्या बैसाखी उत्सवात सामील होण्यासाठी जवळजवळ 25000 शीख तीर्थयात्री रविवारी भारतातून वाघा बॉर्डरवरुन पाकिस्तानमध्ये पोहोचले आहेत. 14 एप्रिलला मुख्य कार्यक्रम होणार आहे. यामध्ये राजकीय, धार्मिक क्षेत्रातले शीखनेते सहभागी होणार आहेत.

 Pakistan flag
Air India Delhi-London Flight Returns: लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांचा गोंधळ, दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग

अशा धार्मिक कार्यक्रमांच्यावेळी हिंसाचाराच्या घटना होण्याचे प्रमाण जास्त असते. गेल्यावर्षी 3 एप्रिलला बैसाखीच्या कार्यक्रमादरम्यान, खलिस्तानी हिरवे झेंडे लावण्याचा व्हिडीओ समोर आले आहेत. या आंदोलनादरम्यान, काही बॅनरदेखील होते.

ज्यामध्ये लिहले होते- 'भारतीय राज्ये शीख समुदायाचे दमन करत असून पंजाब ताब्यात आहे. शीख समुदायाला पाठिंबा द्या.' असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे, आता पून्हा खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याने सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com