Shahbaz Sharaf Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: कंगाल पाकिस्तानचं अणुबॉम्ब प्रेम, IMF च्या बेलआउट पॅकेजसाठी...

IMF Bailout Package: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर गंभीर अशा आर्थिक संकटाचाही सामना करत आहे.

Manish Jadhav

IMF Bailout Package on Pakistan Economic Crisis: पाकिस्तान सध्या राजकीय संकटाबरोबर गंभीर अशा आर्थिक संकटाचाही सामना करत आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) बेलआउट पॅकेजची नितांत गरज आहे.

पाकिस्तान IMF सोबत सातत्याने वाटाघाटी करत आहे, सर्व अटी मान्य करुन IMF लवकरात लवकर कर्ज देण्यास तयार होईल. पण आयएमएफने पाकिस्तानसमोर अशी अट ठेवली आहे, ज्याची पाकिस्तानने कल्पनाही केली नसेल.

या अटीमुळे शाहबाज शरीफ सरकारही बॅकफूटवर आले आहे. शाहबाज शरीफ सरकारने आयएमएफला सांगितले की, काहीही झाले तरी आम्ही आमच्या अणु कार्यक्रमाशी तडजोड करणार नाही. अर्थमंत्री इशाक दार यांनीही या मुद्द्यावर आपले वक्तव्य दिले आहे.

पाकिस्तान अणुबॉम्ब प्रेम सोडत नाही!

पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार यांनी संसदेत रझा रब्बानी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, आयएमएफकडून कर्जासाठी पाकिस्तानच्या (Pakistan) आण्विक कार्यक्रमावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

IMF आणि पाकिस्तान यांच्यात जो काही करार होईल, तो वेबसाइटवर अपलोड केला जाईल जेणेकरुन सर्वांना त्याची माहिती मिळेल. आण्विक कार्यक्रमाशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

आयएमएफकडून कर्जाची गरज

अर्थमंत्री इशाक दार पुढे म्हणाले की, आम्ही पाकिस्तानच्या जनतेचे प्रतिनिधित्व करतो. आम्ही आमच्या लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तत्पर आहोत.

असा कोणताही करार IMF किंवा अन्य कोणाशीही केला जाणार नाही, ज्यामुळे पाकिस्तान किंवा पाकिस्तानी लोकांचे नुकसान होईल. IMF कडून $1.1 बिलियन बेलआउट पॅकेजसाठी बोलणी सुरु आहे.

महागाई शिगेला पोहोचली

विशेष म्हणजे, डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची सातत्याने घसरण होत आहे. येथे महागाई शिगेला पोहोचली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत.

कर्जाबाबत पाकिस्तानची आयएमएफशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरु असली तरी अद्याप पूर्ण झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT