Pakistan Economic Crisis: कर्ज द्या नाहीतर...! दिवाळखोर पाकिस्तानची जगाला हाक

Pakistan's Financial Crisis: पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी तो जगभर सातत्याने भीक मागत आहे.
 Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan PM Shehbaz SharifDainik Gomantak

IMF And Pakistan News: पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी तो जगभर सातत्याने भीक मागत आहे.

शेवटचे वर्ष असेच गेले, पण 2023 हे वर्ष पाकिस्तानसाठी गंभीर आव्हानांचे वर्ष ठरु शकते. पाकिस्तानची कधीही दिवाळखोरी घोषित होऊ शकते, असा इशारा आता देशाचे आर्थिक विश्लेषक देत आहेत.

आता सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात व्यत्यय येण्याचा धोका वाढला आहे. देशातील महागाईचा दर ऐतिहासिकदृष्ट्या जास्त आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. (Give loan or else...! Bankrupt Pakistan's appeal to the world)

मदत मिळाली तरी उंटाच्या तोंडात जिरे

आत्तापर्यंत मुस्लीम ब्रदरहूडचे देश पाकिस्तानवर (Pakistan) मेहरबान होते. दुसरीकडे, चीनही आता पाकिस्तानला आयएमएफच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करण्याचा सल्ला देत आहे. दरम्यान, पाकिस्तानातील आर्थिक परिस्थिती सातत्याने बिघडत चालली आहे.

 Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan Economic Crisis: रशियाने दाखवला पाकिस्तानवर अविश्वास; कच्चे तेल खरेदी करण्यासाठी ठेवली अट

दुसरीकडे, आयएमएफकडून (IMF) निधी मिळाला तरी तो 'उंटाच्या तोंडात जिरे' असल्याचे सिद्ध होणार आहे. लोकांचे उत्पन्न कमी होत आहे.

अशा परिस्थितीत, त्याला IMF कडून 1 अब्ज डॉलर्सची मदत मिळाली तरी हा धोका काही दिवसांसाठीच टळणार आहे. म्हणजेच, पाकिस्तान आता कर्जाच्या सापळ्यात अडकला आहे, आता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नाही.

कारण जुने कर्ज फेडण्यासाठी सातत्याने नवीन कर्जे घेतली जात आहेत. वर्षभरापूर्वी श्रीलंकेत असाच काहीसा प्रकार सुरु होता.

श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तान दिवाळखोर होईल का?

श्रीलंकेत एकाच घराणेशाहीच्या चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक संकट ओढावले आहे. तिजोरीवर बोजा वाढत असतानाही सत्तेत राहण्यासाठी लोकाभिमुख निर्णय घेतले गेले. याचा अर्थ ते दिवाळखोरीच्या दिशेने निघाले होते.

 Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan SSU: कंगाल पाकिस्तानमधील चीनच्या नागरिकांसाठी शहबाज सरकारचा मोठा निर्णय

अशा परिस्थितीत, आता पाकिस्तानबद्दल बोलायचे झाल्यास, पाकिस्तानच्या कर्जाने मोठे रुप धारण केल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यांचे जुने मित्रपक्ष त्यांना एक पैसाही द्यायला तयार नाहीत. त्याचवेळी, जनता आर्थिक संकटाशी झुंजत आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानी लष्करातील अधिकारी आणि नेत्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली, हेही खरे आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या संपत्तीची माहिती दिली होती. म्हणजे, नेते सातत्याने श्रीमंत होत आहेत आणि सामान्य जनता गरीब.

 Pakistan PM Shehbaz Sharif
India slams Pakistan at UNHRC: कंगाल पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उकरून काढताच भारताने सुनावले खडेबोल

त्याचबरोबर, राजकीय अस्थिरतेमुळे गरीब आणि श्रीमंत यांच्यातील दरीही वाढली आहे. पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा जवळपास संपला आहे. अशा परिस्थितीत, IMF ची मदत मिळाली तरी पाकिस्तानला दिवाळखोरीपासून कोणीही वाचवू शकणार नाही, असे मानले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com