Sri Lankan Citizens Death
Sri Lankan Citizens Death Dainik Gomantak
ग्लोबल

'चुका तर होतच असतात', श्रीलंकन नागरिकाच्या हत्येवरुन पाक संरक्षणमंत्र्यांचे बेताल वक्तव्य

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेचे (Sri Lanka) सार्वजनिक सुरक्षा मंत्री शरथ वीरशेखर (Sharath Veershekhar) यांनी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री परवेझ खटक (Pervez Khattak) यांना श्रीलंकन ​​नागरिकाच्या (Sri Lankan Citizen) लिंचिंगच्या संदर्भात केलेल्या कथित असंवेदनशील वक्तव्याबद्दल माफी मागायला सांगितले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली कट्टरपंथी इस्लामी पक्ष तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (Pakistan) (TLP)च्या समर्थकांसह जमावाने गेल्या शुक्रवारी लाहोरपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या सियालकोट जिल्ह्यातील एका कपड्याच्या कारखान्यावर हल्ला केला आणि त्या कारखान्याचे महाव्यवस्थापक दियावदनगे यांच्यावर हल्ला केला. ‘त्याची हत्या करुन मृतदेह जाळण्यात आला.

दरम्यान, पाकिस्तानचे मंत्री खटक यांनी निर्लज्जपणा दाखवत याप्रकरणी अत्यंत असंवेदनशील विधान केले आहे. दियावादनागेच्या हत्येची पाकिस्तान सरकारने टीएलपीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाशी बरोबरी केली जाऊ नये, असे ते म्हणाले होते. खटक यांच्या टीकेला उत्तर देताना वीरशेखर यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी या असंवेदनशील वक्तव्याबद्दल श्रीलंकेच्या लोकांची माफी मागावी, असे ते म्हणाले.

पाकिस्तानचे मंत्री खटक यांनी निर्लज्जपणा दाखवत याप्रकरणी अत्यंत असंवेदनशील विधान केले आहे. दियावादनागेच्या हत्येची पाकिस्तान सरकारने टीएलपीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाशी बरोबरी केली जाऊ नये, असे ते म्हणाले होते. खटक यांच्या टीकेला उत्तर देताना वीरशेखर यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी या असंवेदनशील वक्तव्याबद्दल श्रीलंकेच्या लोकांची माफी मागावी, असे ते म्हणाले.

ईशनिंदा केल्याच्या आरोपावरुन निर्घृण हत्या

शुक्रवारी प्रियंता कुमारा दियावदना (Priyantha Kumara Diyawadana) यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांना जिवंत जाळण्यात आले. कट्टरपंथी पक्षाने आरोप केला आहे की, पंजाब प्रांतातील एका कपड्याच्या कारखान्यावर ईशनिंदेमुळे हल्ला करण्यात आला. दियावदान हे श्रीलंकेतील कॅंडी येथील सियालकोट जिल्ह्यातील एका कापड कारखान्याचे महाव्यवस्थापक होते.

सुरक्षेची मागणी

या घटनेनंतर श्रीलंका सरकारही प्रचंड संतापले आहे. पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या श्रीलंकन​कामगारांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी इस्लामाबादशी चर्चा करावी, असे श्रीलंकन सरकार आणि विरोधकांनी एकत्रितपणे सांगितले. मात्र, अशा स्थितीत पाकमंत्र्यांच्या असंवेदनशील वक्तव्याने आगीत आणखीनच भर पडली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मात्र या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्यांनी ट्विट केले की, “सियालकोटमधील कारखान्यावर हल्ला आणि श्रीलंकेच्या व्यवस्थापकाला जिवंत जाळणे हा पाकिस्तानसाठी लाजिरवाणा दिवस आहे. मी वैयक्तिकरित्या तपासावर देखरेख करत असून कोणताही निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. दोषींना शिक्षा होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Blue Origin Flight: ऐतिहासिक! राकेश शर्मानंतर गोपीचंद थोटाकुरा ठरले अंतराळात जाणारे दुसरे भारतीय

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

SCROLL FOR NEXT