श्रीलंकन ​​नागरिकाची हत्या,पाकिस्तानच्या दहशतवादाचा क्रूर चेहरा

काही दिवसांपूर्वी श्रीलंकन ​​नागरिकावर ईशनिंदा केल्याचा आरोप करत त्यांना मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर कट्टरवाद्यांनी यानंतर त्यांचा मृतदेह जाळला होता.
Postmortem report of  Priyantha Kumara  whom Pakistan murdered in lynching
Postmortem report of Priyantha Kumara whom Pakistan murdered in lynching Dainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतात श्रीलंकन (Shi Lanka) ​​नागरिक प्रियंता कुमारा (Priyantha Kumara) दियावदनासोबत अतिरेक्यांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. प्रियंता कुमारा दियावदना यांना लिंचिंगच्या लाजिरवाण्या घटनेनंतर, त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्यासोबत झालेल्या दुःखाचे वर्णन केले आहे. पाकिस्तानी चॅनल जिओ न्यूजच्या वृत्ताचा हवाला देत पीटीआय या वृत्तसंस्थेने सांगितले की, दियावदना यांना इतका मारहाण करण्यात आली की तिच्या शरीराची जवळपास सर्व हाडे तुटली होती एवढेच नाही तर शैतानांनी त्याचा मृतदेह 99 टक्के जाळण्यात आला होता. (Postmortem report of Priyantha Kumara whom Pakistan murdered in lynching)

काही दिवसांपूर्वी कट्टर इस्लामी पक्ष तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) च्या समर्थकांनी शुक्रवारी एका कपड्याच्या कारखान्यावर हल्ला करत कारखान्याचे सरव्यवस्थापक प्रियंता कुमारा दियावदना (40) या श्रीलंकन ​​नागरिकावर ईशनिंदा केल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर कट्टरवाद्यांनी यानंतर त्यांचा मृतदेह जाळला होता. दियावदनाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण तुटलेली कवटी आणि जबड्याचे हाड असल्याचे नमूद केले आहे.

एवढेच नाही तर बेदम मारहाणीमुळे त्याचे यकृत, पोट आणि किडनी या महत्त्वाच्या अवयवांनाही दुखापत झाली होती.त्यांच्या संपूर्ण शरीरावर कट्टरवाद्यांच्या अत्याचाराच्या खुणा असल्याचे डॉक्टरांनी अहवालात लिहिले आहे. त्यांना इतका मार लागला की त्यांच्या पाठीचा कणा तीन ठिकाणी तुटला. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, दियावदनाच्या शरीराचा 99 टक्के भाग जळाला होता. पंजाब पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, पायाच्या एका पंजाचे हाड वगळता संपूर्ण शरीराची हाडे तुटलेली आहेत.

शवविच्छेदनानंतर दियावदनाचा मृतदेह आता श्रीलंकेच्या वाणिज्य दूतावासाकडे सोपवण्यात येणार आहे. सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर पार्थिव विशेष विमानाने श्रीलंकेला पाठवले जाईल. दरम्यान, या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे ज्यामध्ये एक व्यक्ती दियावदनाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दियावदनाच्या मृत्यूनंतर आणखी एक व्यक्तीही मृतदेहाला अग्नी देऊ नका, अशी विनंती करताना दिसतो, मात्र धर्मांधांनी त्याला बाजूला ढकलले.

आंतरराष्ट्रीय दबावानंतर, इम्रान खानच्या सरकारने दहशतवादाच्या आरोपाखाली 800 हून अधिक लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्याच वेळी, अटक केलेल्या 118 पैकी 13 प्रमुख संशयित असल्याचे सांगितले जात आहेत. दुसरीकडे, या घटनेबाबत श्रीलंकेत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. श्रीलंकेची संसद, अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी इम्रान खान दोषींना नक्कीच शिक्षा करतील, अशी आशा व्यक्त केली आहे .तसेच त्यांनी पाकिस्तनकडून उर्वरित श्रीलंकन ​​स्थलांतरित कामगारांच्या सुरक्षिततेची अपेक्षा केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com