Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

'पाकिस्तानचे तीन तुकडे होतील', इम्रान खान यांचा घणाघात

योग्य निर्णय न घेतल्यास देशाचे तीन तुकडे होतील, असा इशारा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी सरकारला दिला आहे.

दैनिक गोमन्तक

योग्य निर्णय न घेतल्यास देशाचे तीन तुकडे होतील, असा इशारा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारला दिला आहे. सरकारविरोधात इम्रान खान यांनी मोर्चा खोलला आहे. इम्रान खान म्हणाले की, शाहबाज सरकार आणि लष्करी संस्थांनी योग्य निर्णय घेतला नाही तर पाकिस्तानचे तीन तुकडे होतील. एका मुलाखतीत त्यांनी देश 'आत्महत्या'च्या मार्गावर असल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची नितांत गरज आहे. (Pakistan can be divided into three pieces said imran khan)

'सशस्त्र दल आधी नष्ट होईल'

इथे खरी अडचण सत्तास्थापनेची असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले आहे. जर सरकारी संस्थांनी योग्य निर्णय घेतला नाही, तर मी तुम्हाला लिहून देतो की, पाकिस्तानचे तीन तुकडे होतील. त्यातही पाकिस्तानची सेना पहिल्यांदा नष्ट होईल, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमध्ये सत्ता स्थापनेचा अर्थ राजकीय नेतृत्वाव्यतिरिक्त लष्करी नेतृत्व मानला जातो. अशा स्थितीत त्यांचे हे वक्तव्य दोघांवरही टीका मानली जात आहे.

बलुचिस्तान वेगळे करण्याचा भारत विचार करत आहे

त्यांनी पुढे म्हटले आहे की, एकदा देश नष्ट झाला की ते डिफॉल्ट होईल आणि आंतरराष्ट्रीय जग पाकिस्तानला (Pakistan) आण्विक नि:शस्त्रीकरणाकडे जाण्यास सांगेल. जसे 1990 च्या दशकात युक्रेनसोबत केले गेले होते. परदेशातील भारतीय थिंक टँक बलुचिस्तान (Balochistan) वेगळे करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्याकडे एक योजना आहे, म्हणूनच मी दबाव टाकत आहे.

शरीफ सरकार अमेरिका आणि भारतासाठी काम करते

शाहबाज सरकारवर निशाणा साधत इम्रान खान (Imran Khan) म्हणाले की, आघाडी सरकार अमेरिकेला खूश करण्यासाठी काम करत आहे. नवाझ शरीफ आणि आसिफ अली झरदारी यांनी नेहमीच अमेरिका (America), भारत आणि इस्रायलची युती बनवण्याचे काम केले आहे. शाहबाज सरकारची पाकिस्तानसाठी काही ठोक योजना नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

SCROLL FOR NEXT