पाकिस्तान आणि भारत यांच्यातील आंतराष्ट्रीय संबध परंपरागतरित्या ताणले गेले आहेत. पण ते पुर्ववत होण्यासाठीची अनुकूलता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दर्शवली आहे. ही सकारात्मकता दर्शवतानाच काश्मीर आणि कलम 370 बाबत संताप ही व्यक्त केला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ तुर्की वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. (Pakistan wants to trade with India )
शरीफ यांनी बोलताना भारताच्या भुमिकेमूळे पाकिस्तानच्या व्यापार व्यवसायावर अनिष्ट परिणाम झाला असे स्पष्ट केले. भारताने पाकिस्तानला 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मोस्ट फेव्हर्ड नेशन्सच्या यादीतून वगळले होते. त्याचा थेट परिणाम पाकिस्तानच्या व्यापारावर झाला. परिणामी पाकिस्तानची आर्थिक स्थिती अधिकच खालावल्याचं ते म्हणाले.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती सातत्याने खालावत चालली आहे. सरकारच्या अपयशाचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, पाकिस्तान भारतासोबत जास्तीत जास्त व्यापार वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून आपली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येईल. दरम्यान, आता भारतासोबतच्या व्यापाराबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे वक्तव्य समोर आले आहे. मात्र या दरम्यान त्यांनी काश्मीर आणि कलम 370 बाबतही संताप व्यक्त केला आहे.
भारतासोबत व्यापार सुरू करण्यासाठी प्रयत्न
भारतासोबत सर्व प्रकारचा व्यापार कसा सुरू करता येईल यासाठी पाकिस्तान आता सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यासाठी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा भारतासोबत व्यापारासाठी व्यापार मंत्र्यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली. दरम्यान, पाकिस्तान मंत्रिमंडळाने कमर जमान यांची भारतातील व्यापार मंत्री म्हणून नियुक्ती केली. मात्र, दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही, अशी भारताची पाकिस्तानबाबत नेहमीच भूमिका राहिली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.