Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

कर्जमाफीसाठी पाकिस्तान विकतोय शेळ्या, वाचा संपूर्ण प्रकरण

आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान (Pakistan) कर्जासाठी अनेक देशांच्या वाऱ्या करत आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan Economy Crisis: आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान कर्जासाठी अनेक देशांच्या वाऱ्या करत आहे. चीन, यूएई आणि सौदी अरेबियासारख्या देशांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला कर्ज नाकारले होते. या संकटाच्या काळात पाकिस्तान या देशांना मदत मिळवून देण्याची एकही संधी सोडू इच्छित नाही. कर्जमाफीसाठी पाकिस्तान या देशांना कितपत भुरळ घालण्यास तयार आहे, याचा अंदाज पाकिस्तान सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयावरुन लावला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी पाकिस्तान सरकारने दुबईला 100 शेळ्या निर्यात करण्यासाठी विशेष परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. (Pakistan cabinet bends rules allows export of 100 live goats for UAE president)

2020 मध्ये, पाकिस्तानने जिवंत प्राण्यांच्या निर्यातीवर बंदी घातली होती

न्यूज इंटरनॅशनलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली आहे. यापूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाने इस्लामाबादमधील अमिरातीच्या दूतावासाच्या विशेष विनंतीवरुन संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये शेळ्यांच्या निर्यातीचा सारांश कॅबिनेटकडे पाठवला होता. एक्सपोर्ट पॉलिसी ऑर्डर 2020 अंतर्गत देशात जिवंत प्राण्यांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती.

कोण आहेत शेख मोहम्मद बिन झायेद

यूएईचे विद्यमान अध्यक्ष जनरल शेख मोहम्मद बिन झायेद यांनी शेळ्यांच्या निर्यातीसाठी विशेष परवानगी मागितली होती. खलिफा बिन झायेद अल नाहयान यांच्या जागी शेख मोहम्मद बिन झायेद अल-नाहयान यांची नुकतीच अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती आहे. खलिफा बिन झायेद अल नाहयान 2004 पासून अध्यक्ष होते, परंतु दीर्घ आजाराने वयाच्या 73 व्या वर्षी गेल्या महिन्यात त्यांचे निधन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT