Pakistan Prime Minister Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: पाकिस्तानच्या नापाक रणनितीचा पर्दाफाश, टूलकिटच्या माध्यमातून भारताला बदनाम करण्यासाठी...

Article 370 Removal: जगामध्ये भारताची बदनामी करण्यासाठी, पाकिस्तान सरकारने टूलकिटद्वारे एक कट रचला आहे, जो जगभरातील आपल्या दूतावासांमार्फत राबवण्याची तयारी करत आहे.

Manish Jadhav

Pakistan Conspiracy Exposed: मोदी सरकारने जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 (5 ऑगस्ट 2019) हटवल्यापासून पाकिस्तान चांगलाच हादरला आहे. जगभरात भारताला बदनाम करण्यासाठी पाकिस्तानने मोठे मनसुबे रचले आहेत. त्याअंतर्गत जगातील अनेक देशांतील भारतीय दूतावासांसमोर आंदोलन करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. जगामध्ये भारताची बदनामी करण्यासाठी, पाकिस्तान सरकारने टूलकिटद्वारे एक कट रचला आहे, जो जगभरातील आपल्या दूतावासांमार्फत राबवण्याची तयारी करत आहे.

अहवालात मोठा खुलासा

मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) ब्लॅक डे नावाने भारताविरोधात निदर्शनेही आयोजित करत आहे. या निदर्शनांच्या माध्यमातून भारताने जम्मू-काश्मीरमधून आजच्या दिवशी ज्या पद्धतीने कलम 370 हटवले ते चुकीचे होते, हे सर्वसामान्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुझफ्फराबादमध्ये अनेक ठिकाणी भारताविरोधात पोस्टर लावण्यात आले आहेत.

यासीन मलिकच्या सुटकेसाठी निदर्शने

भारताविरोधातील निदर्शने यशस्वी करण्यासाठी ते युरोपातील अनेक देशांमध्ये आपल्या कारवाया तीव्र करत आहेत. ब्रिटनमधील पाकिस्तानी काश्मिरींच्या मदतीने भारतीय उच्चायुक्तालयासमोर निदर्शने करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासोबतच, दहशतवादी कारवायांसाठी तुरुंगात असलेल्या यासीन मलिकच्या सुटकेच्या मागणीसाठी निदर्शनेही केली जात आहेत. अशा निषेधाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान युरोपीय देशांतील खासदारांनाही आमंत्रित करत आहे.

पाकिस्तानची टूलकिट तयार

भारताविरुद्ध कट रचण्यासाठी पाकिस्तानने तयार केलेल्या टूल किटमध्ये 5 ऑगस्ट रोजी भारताची बदनामी करण्यासाठी खास हॅश टॅगही तयार करण्यात आला आहे. ज्यामध्ये #FreeKashmir, #Article370, #Kashmir आणि #KashmirBleeds नावाचे हॅशटॅग ट्रेंड करुन जगभरातील पाकिस्तानी लोकांना देखील सोशल मीडियावर पोस्ट करण्यास सांगितले आहे.

पाकिस्तानने काश्मीरसंदर्भात टूलकिट तयार केले आहेत, ज्यामध्ये भारताविरोधात बॅनर कसे वापरायचे, काश्मीरबाबत सोशल मीडियावर भारताविरोधात ट्विट करण्यासाठी कोणते हॅशटॅग आणि भारतीय दूतावास आणि उच्चायुक्तालयासमोर कोणते बॅनर लावायचे, याची तयारी केली आहे. पाकिस्तानने काही पत्रकारांना आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये काश्मीरचे कव्हरेज करण्याच्या कामात गुंतवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT