Pakistan: कंगाल पाकिस्तान करणार शस्त्रास्त्रे निर्यात? दोन शक्तीशाली मिसाईल आणले जगासमोर

Pakistan: यातील एका मिसाइलचे नाव तैमूर क्रूज मिसाईल तर दुसऱ्याचे नाव फाज असे आहे.
Taimur
TaimurDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan: आर्थिक संकटाचा सामना करत असलेला पाकिस्तान सातत्याने आपल्या निर्णय, खळबळजनक वक्तव्ये यांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही काळापासून पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करत आहे.

यामुळे पाकिस्तानमधील सामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर पासून अन्नधान्यापर्यत जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींसाठी लढा देत असलेल्या अनेक घटना समोर आल्या होत्या. आता हाच पाकिस्तान शस्त्रास्त्रे निर्यात करण्याची स्वप्ने बघत आहे. यामध्ये तुर्की पाकिस्तानची मदत करत असल्याचे म्हटले जात आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, तुर्कीमध्ये काही दिवसांपूर्वी ग्लोबल इंडस्ट्रियल अँड डिफेन्स सोल्यूशनच्या 16 व्या इंटरनॅशनल डिफेन्स इंडस्ट्री फेयरमध्ये पाकिस्तानने आपल्याकडील शस्त्रात्रांचे प्रदर्शन मांडले होते.

यामध्ये पाकिस्तानची अत्यंत महत्वपूर्ण अशा दोन एयर लॉन्च तैमूर क्रूज मिसाइलचा देखील समावेश होता. यातील एका मिसाईलचे नाव तैमूर क्रूज मिसाईल तर दुसऱ्याचे नाव फाज असे आहे. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानने हे दोन क्रूज मिसाइल पहिल्यांदाच जगासमोर आणले होते.

तैमूर क्रूज मिसाईल

पाकिस्तानचे तैमूर क्रूझ क्षेपणास्त्र लढाऊ विमानातून डागले जाऊ शकते. तैमूर क्षेपणास्त्र खास हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे स्टँड-ऑफ अँटी-शिप आणि लँड अॅटॅक क्रूझ मिसाइल म्हणून काम करते.

यात एक मॉड्यूलर डिझाइन आहे ज्यामध्ये विविध अत्याधुनिक तंत्रज्ञाना( Technology)चा समावेश आहे. एरोडायनॅमिक बॉक्स शेप फ्यूजलेज हा या क्षेपणास्त्राचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.

तैमूर क्षेपणास्त्राच्या पुढच्या टोकाला इमेजिंग इन्फ्रारेड (IR) बसवलेले असल्याने हे मिसाईल अचूकतेने लक्ष्य गाठण्यात मदत करते. हवेतून जमिनीवर हल्ला करण्यासाठी, तैमूरला मध्यभागी फोल्ड करण्यायोग्य पंख बसवले आहेत. यासोबतच क्षेपणास्त्राच्या मागील भागात टेल कंट्रोल पृष्ठभागासह शक्तिशाली टर्बोजेट इंजिन बसवण्यात आले आहे.

Taimur
Worlds Oldest Man: जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन, काही दिवसातच...

फाज क्रूज मिसाइल

तैमुरसोबत ज्या मिसाइलचे पाकिस्तानने संपूर्ण जगासमोर अनावरण केले ते दुसरे मिसाईल म्हणजे फाज मिसाइल होय. हे मिसाईल हवेतून हवेत मारा करते. यातून पाकिस्तानच्या वाढत्या हवाई शक्ती लक्षात घेतले जाऊ शकते.

दरम्यान, पाकिस्तानने शस्त्रांत्रामध्ये प्रगती केली असली तरीही पाकिस्तानमध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे अस्थिरता दिसून येते. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये इमरान खान यांच्या अटकेच्या सत्रामुळे मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. आता पाकिस्तान देशामध्ये कशी शांतता प्रस्थापित करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com