Pakistan army surrender to BLA: DainikGomantak
ग्लोबल

VIDEO: पाकिस्तान सैन्याची नाचक्की! BLA समोर जवानांनी टेकले गुडघे, पाक सरकारला 7 दिवसांचा अल्टीमेटम; अन्यथा 'मृत्यूदंड' निश्चित

Pakistan army surrender to BLA: बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याला पुन्हा एकदा मोठ्या अपमानाचा सामना करावा लागला आहे.

Sameer Amunekar

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्याला पुन्हा एकदा मोठ्या अपमानाचा सामना करावा लागला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या (BLA) लढाऊ सैनिकांसमोर पाकिस्तानी जवानांनी चक्क गुडघे टेकून शरणागती पत्करल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी बेइज्जती होत आहे. बीएलएने ७ पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवले असून, त्यांच्या बदल्यात सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम जारी केला आहे.

'युद्धबंदी' म्हणून सात सैनिकांना केले कैद

बीएलएच्या प्रवक्त्याने जाहीर केलेल्या निवेदनानुसार, एका विशेष मोहिमेदरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या सात सैनिकांना बंधक बनवले आहे. बीएलए या सैनिकांना 'युद्धबंदी' (Prisoners of War) मानत असून, त्यांच्या सुटकेसाठी पाकिस्तान सरकारसमोर अटी ठेवल्या आहेत. या सैनिकांच्या बदल्यात बलुच राजकीय कैदी, बेपत्ता व्यक्ती आणि इतर स्थानिकांची सुटका करण्याची मागणी करण्यात आली आहे. जर सात दिवसांत ठोस पाऊल उचलले नाही, तर या सैनिकांचा 'बलुच नॅशनल कोर्ट'मध्ये खटला चालवून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

सोशल मीडियावर बीएलएने या बंधक सैनिकांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी जवान अत्यंत हतबल अवस्थेत दिसत असून, ते लष्करप्रमुख असीम मुनीर यांना आवाहन करत आहेत. "बीएलएच्या मागण्या मान्य करा आणि आमची सुटका करा," अशी विनंती हे जवान करताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे पाकिस्तानच्या 'पोलादी' लष्कराच्या प्रतिमेला मोठा तडा गेला असून, शहबाज शरीफ यांच्या दाव्यांची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.

दशकांचा संघर्ष

बलुचिस्तानमध्ये गेल्या अनेक दशकांपासून पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची मागणी होत आहे. पाकिस्तानी लष्कराकडून होणारे अत्याचार, मानवाधिकार उल्लंघन आणि नैसर्गिक संसाधनांची लूट यांविरोधात बलुच जनता आक्रमक झाली आहे. २०२५ मध्येही बीएलएने 'जाफर एक्सप्रेस' हायजॅक करून शेकडो प्रवाशांना ओलीस ठेवले होते, त्यावेळी 'ऑपरेशन ग्रीन बोलन' राबवण्यात आले होते. मात्र, आता थेट सैनिकांनीच शस्त्रे टाकून शरणागती पत्करल्याने पाकिस्तानच्या संरक्षण धोरणाचे धिंडवडे निघाले आहेत. या घटनेमुळे बलुचिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: गोंयकारपणाच्या कढीला ऊत!

Accident Death: सांगोल्डा येथे भीषण अपघात; महाराष्ट्रातील दुचाकीस्वाराचा मृत्यू, संरक्षक भिंतीला धडकल्याने घडला अनर्थ

Goa Health: 'एआय'च्या मदतीने फुफ्फुसाच्या कॅन्सरवर मात; राज्यातील 1.28 लाख नागरिकांची तपासणी पूर्ण, आरोग्यमंत्र्यांची माहिती

Mumbai Indians captaincy: रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा 'कॅप्टन'? MI च्या गोटातून आली सर्वात मोठी अपडेट!

Goa Theft: चोरट्यांचा सिनेस्टाईल डाव; म्हापशातील तीन कार्यालयांतून रोकड आणि साहित्य चोरी, मध्यरात्री साधली संधी

SCROLL FOR NEXT