Goa GI Tag: पावपोळी, केरसुणी, डोसला ‘जीआय’साठी प्रयत्‍न! विज्ञान-तंत्रज्ञान मंडळ करणार प्रस्‍ताव सादर

Goa GI Tag News: पावपोळी, माडाच्‍या हिरापासून तयार केलेली केरसुणी आणि डोस (बेसणाची काफ) या तीन वस्‍तूंना जीआय मानांकन मिळवून घेण्‍याच्‍या हालचाली सुरू केलेल्‍या आहेत.
Goa GI Tag
Goa GI TagDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: याआधी १५ वस्‍तूंना जीआय मानांकन मिळवून घेतलेल्‍या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंडळाने पुढील काळात राज्‍यातील पावपोळी, माडाच्‍या हिरापासून तयार केलेली केरसुणी आणि डोस (बेसणाची काफ) या तीन वस्‍तूंना जीआय मानांकन मिळवून घेण्‍याच्‍या हालचाली सुरू केलेल्‍या आहेत.

गोव्‍यातील काजू फेणी, मयंडोळी केळी, हरमलची मिरची, खाजे, मानकुराद आंबा, बेबिंका, आगशीची वांगी, सातशिरा भेंडी, ताळगावची वांगी, हिलारियो आंबा, कोरगुट तांदूळ, काजू बोंडू, मुसराद आंबा आदींसारख्‍या पंधरा वस्‍तूंना याआधी जीआय मानांकन मिळालेले आहे.

त्‍यानंतर राज्‍य विज्ञान आणि तंत्रज्ञान मंडळाने काहीच महिन्‍यांपूर्वी मीठाचा प्रस्‍तावही सादर केलेला आहे. त्‍यानंतर आता पावपोळी, माडाच्‍या हिरापासून तयार केलेली केरसुणी आणि डोस या तीन वस्‍तूंची जीआय मानांकनासाठी शिफारस करण्‍याची प्रक्रिया सुरू केल्‍याची माहिती मंडळाचे नोडल अधिकारी दीपक परब यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

Goa GI Tag
Taleigao: वांगी, आंबा, तांदूळ, काजू बोंडेसाठी GI दर्जा मिळालेले; विशिष्ट मातीच्या गुणधर्माचे 'ताळगाव'

विशिष्ट भौगोलिक प्रदेशात उत्पादित होणाऱ्या आणि विशेष गुणवत्ता किंवा गुणधर्म असलेल्या वस्तूंनाच कायदेशीररीत्‍या जीआय मानांकन देण्‍यात येते. अशा वस्‍तूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळते. त्‍यामुळे त्‍यांच्‍या निर्यातीला प्रोत्साहन मिळते. जीआय मानांकनामुळे बनावट उत्पादनांना रोखण्‍यास मदत मिळते. दर्जेदार वस्तूंना बाजारात अधिक दर मिळवून देण्‍यासह शेतकरी किंवा कारागिरांचा आर्थिक स्तर उंचावण्‍यात जीआय मानांकन महत्त्‍वपूर्ण भूमिका बजावत असते.

Goa GI Tag
Goa GI Tag: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 5 नवीन उत्पादनांना मिळाले 'GI' मानांक; कृषी समृद्धीचा जागतिक गौरव

मीठ उत्‍पादक असोसिएशनची स्‍थापना

राज्‍यातील पारंपरिक मीठाला जीआय मानांकन मिळवून घेण्‍यासाठी ‘जीआय’ निबंधकांकडे अर्ज सादर केल्‍यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान मंडळाने काहीच दिवसांपूर्वी मीठ उत्‍पादकांची बैठक घेतली. त्‍यात मीठ उत्‍पादक असोसिएशनची स्‍थापनाही करण्‍यात आलेली आहे, अशी माहिती दीपक परब यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com