Pakistan Army 
ग्लोबल

Pakistan Army: भारताला पाकिस्तान लष्करी जवानही घाबरले; सैन्यात मोठा असंतोष, हजारो जवानांचा राजीनामा

Pahalgam Attack: पाकिस्तानी लष्करात राजीनाम्याचे सत्र सुरू असून लष्कराचे मनोबल सातत्याने घसरत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या सक्त धोरणानंतर पाकिस्तानी लष्कारात सध्या भीतीचे वातावरण पाहायला मिळत असून, अनेक सैनिकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

पहलगाम येथील घटनेनंतर जवानांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आणि मोठ्या प्रमाणावर राजीनाम्याच्या विनंत्या येत आहेत, अशी माहिती पाकिस्तानी लष्कराच्या जनरल हेडक्वार्टर (GHQ) रावळपिंडी येथून जारी करण्यात आलेल्या गोपनीय सल्लागार (सल्लागार क्रमांक: ISPR/OPS/2025/04/028) यातून देण्यात आली आहे. मेजर जनरल फैसल महमूद मलिक, HI(M), DG ISPR यांनी हे परिपत्रक जारी केले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून संभाव्य कठोर कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. वृत्तानुसार, भारतीय लष्कराच्या प्रत्युत्तराच्या भीतीने सुमारे 1200 पाकिस्तानी सैनिकांनी राजीनामा दिला आहे. पाकिस्तानी लष्करात राजीनाम्याचे सत्र सुरू असून लष्कराचे मनोबल सातत्याने घसरत आहे.

भारताच्या संभाव्य कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये चिंतेची लाट निर्माण झाली आहे, असे सुरक्षा विश्लेषकांचे मत आहे. भारताने सीमेवर अलर्ट जारी केला असून, सुरक्षा वाढवली आहे. दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाई करण्याची तयारी भारताने केली आहे,

या ॲडव्हायझरीमध्ये लष्कराच्या जवानांसाठी तीन मुख्य सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

शपथेचे पालन करा: मुजाहिद म्हणून त्यांचे कर्तव्य राष्ट्राचे रक्षण करणे आहे. ही एक पवित्र जबाबदारी आहे. जवानांना भीतीवर मात करुन खंबीरपणे उभे राहण्यास सांगितले जात आहे.

मनोबल कायम ठेवा: सैन्याने कोणत्याही परिस्थितीत युद्धासाठी तयार राहावे यासाठी भर दिला जात आहे. 'ऑपरेशन स्विफ्ट रिटॉर्ट' सारख्या कारवाईचा दाखला देत कमांडिंग अधिकाऱ्यांना सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत.

शिस्त राखा : राजीनामा देणाऱ्या किंवा परवानगीशिवाय सैन्यदल सोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अशा प्रकरणांमध्ये 'पाकिस्तान आर्मी ॲक्ट, 1952' अंतर्गत कठोर शिक्षा दिली जाईल, असे बजावले आहे.

या परिपत्रकाच्या अखेरीस, सैनिकांना शहीदांच्या वारशाचे वारसदार असल्याचे सांगून एकता टिकवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाकिस्तानी चिन्हाखाली एकजूट राहण्याचा संदेश सर्वांना देण्यात आला आहे.

मेजर जनरल फैसल महमूद मलिक यांच्या स्वाक्षरीने आणि 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देऊन या परिपत्रक समाप्त होते. लष्कराच्या उच्च पदस्थांना परिस्थितीचे संपूर्ण गांभीर्य आहे आणि ते सैनिकांमध्ये पसरलेल्या असंतोषावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची तयारी करत आहेत, असे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jasprit Bumrah Retirement: रोहित-विराटनंतर बुमराहही कसोटी क्रिकेटला करणार रामराम? माजी भारतीय खेळाडूच्या विधानाने खळबळ

पोलिसांनाच धक्काबुक्की! "खवळलेल्या समुद्रात पोहू नका" म्हटल्याने तामिळनाडूच्या पर्यटकांची गुंडगिरी; 5 जणांना अटक

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Goa Live News: "POGO विधेयक एक दिवस विधानसभेत मंजूर होईल" मनोज

SCROLL FOR NEXT