Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Imran Khan: इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या, 625 एकर जमीन फसवणुकीप्रकरणी बजावले समन्स

Pakistan Political Crisis: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नाहीत.

Manish Jadhav

Pakistan Political Crisis: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नाहीत. आता, 625 एकर जमीन फसवणुकीप्रकरणी त्यांना सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक संस्थेसमोर (ACE) हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लैय्या जिल्ह्यातील भ्रष्टाचार प्रकरणात खान, त्यांची बहीण उज्मा खान आणि त्यांचे पती अहद माजीद यांना समन्स बजावण्यात आल्याचे एसीईने म्हटले आहे.

एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राच्या बातमीनुसार, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना 19 जून रोजी ACE मुख्यालयासमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, तर उज्मा आणि त्यांच्या पतीला ACE महासंचालकांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

प्रवक्त्याने दावा केला की, ACE कडे लैय्या भ्रष्टाचार प्रकरणात खान यांच्या सहभागाचे ठोस पुरावे आहेत. ते पुढे म्हणाले की, बनी गालाच्या महसूल अधिकाऱ्यांना बेकायदेशीर जमीन हस्तांतरित करण्यास भाग पाडले होते. खान यांचे इस्लामाबाद (Islamabad) येथे घर आहे.

घोटाळ्याचा आरोप

दरम्यान, उज्मा यांच्यावर जिल्ह्यातील 5,261 कनाल जमीन खरेदीत कथित घोटाळ्याचा आरोप आहे. या जमिनीची मार्केट किंमत सुमारे सहा अब्ज डॉलर आहे, तर ती केवळ 13 कोटी पाकिस्तानी रुपयात खरेदी करण्यात आली. एसीईने सांगितले की, खान दाम्पत्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 2021-22 मध्ये फसवणूक करुन जमीन खरेदी करण्यात आली होती. उज्मा आणि मजीद यांनी त्यांच्या नावे जमिनीचे बनावट हस्तांतरण केले होते. आशियाई विकास बँकेने (ADB) ग्रेटर थल कालवा प्रकल्पासाठी आर्थिक मदत जाहीर केली तेव्हा, ही जमीन खरेदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तक्रारी दाखल झाल्या

प्रवक्त्याने सांगितले की, उज्मा यांना या प्रकल्पाची पूर्व माहिती होती आणि या जोडप्याने जमीन मालकाला त्यांची जमीन त्यांना विकण्यास भाग पाडले. जमीनमालकांनी उज्मा आणि इतरांविरुद्ध जबरदस्तीने त्यांची जमीन विकत घेतल्याच्या तक्रारी केल्या होत्या.

ACE ने गेल्या आठवड्यात सांगितले की, राजकीय प्रभावाचा वापर करुन स्थानिक लोकांची जमीन बळकावण्यात आली, जे तिथे वर्षानुवर्षे राहत होते. लैय्या जमीन भ्रष्टाचार प्रकरणी खानविरोधात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये इम्रान यांची पंतप्रधानपदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर त्यांच्याविरोधात एकूण गुन्ह्यांची संख्या 140 वर पोहोचली आहे. खान यांच्यावर दाखल करण्यात आलेले बहुतांश गुन्हे हे दहशतवाद, हिंसाचार, जाळपोळ, ईशनिंदा, हत्येचा प्रयत्न, भ्रष्टाचार (Corruption) आणि फसवणुकीशी संबंधित आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fatima Sana Shaikh In Goa: 20 मिनिटांचा संघर्ष अन् 'ती' धाडसी उडी! 'दंगल' गर्लचा गोव्यात थरार, फातिमा सना शेखचा Video Viral

Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Tara Sutaria Breakup: तारा सुतारिया आणि वीर पहाडियाचे ब्रेकअप? 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर नात्यात दुरावा Watch Video

SCROLL FOR NEXT