Pakistan Political Crisis: इम्रान खानला आणखी एक मोठा झटका, पीटीआय अध्यक्ष परवेझ इलाही यांना अटक

PTI President Parvez Elahi Arrested: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आणखी एक धक्का बसला आहे.
PTI President Parvez Elahi Arrested
PTI President Parvez Elahi ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

PTI President Parvez Elahi Arrested: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना आणखी एक धक्का बसला आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) चे अध्यक्ष परवेझ इलाही यांना लाहोरमधील त्यांच्या घराबाहेर भ्रष्टाचारविरोधी पथकाने अटक केल्याचे जिओ न्यूजने गुरुवारी सांगितले.

परवेझ इलाही यांच्या अटकेनंतर पीटीआय कार्यकर्त्यांमध्ये घबराट पसरली आहे. इम्रान खान यांनाही हा मोठा धक्का मानला जात आहे.

परवेझ इलाही हे पीटीआयचे दुसरे मोठे नेते आहेत, ज्यांना भ्रष्टाचारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. भ्रष्टाचार प्रकरणातच इम्रान खान यांना अटकही झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबचे माजी मुख्यमंत्री परवेझ इलाही यांची कार लाहोरच्या (Lahore) गुलबर्ग भागात जहूर इलाही यांच्या घराजवळ थांबवल्यानंतर त्यांना भ्रष्टाचारविरोधी पथकाने ताब्यात घेतले. इलाही यांना अटकेतून सुटण्याची किंवा पळून संधीच मिळाली नाही.

PTI President Parvez Elahi Arrested
Pakistan Political Crisis: इम्रान खान देशाविरुद्ध कट रचतायेत, पाक मंत्र्याचा धक्कादायक खुलासा

दुसरीकडे, इम्रान यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी अटकेच्या भीतीने आधीच राजीनामा देऊन मैदान सोडले आहे. आता इम्रान खान एकटे पडले आहेत. शाहबाज शरीफ यांच्या सरकारने आता खान यांच्यावर अशी पकड घट्ट केली आहे की, त्यांना कोणताही मार्ग सापडत नाहीये.

यापूर्वी, इम्रान यांचे निकवर्तीय आणि त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते फवाद चौधरी यांनी पीटीआय पक्षाचा राजीनामा दिला. इम्रान यांच्या अटकेनंतर 9 मे रोजी उसळलेल्या हिंसाचाराचा त्यांनी निषेध केला होता.

दरम्यान, फवाद चौधरी हे 2018 मधील इम्रान यांच्या विजयाचे मुख्य शिल्पकार मानले जातात. मी राजकारणातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्वीट चौधरी यांनी केले होते.

PTI President Parvez Elahi Arrested
Pakistan Political Crisis: पाकिस्तानात पुन्हा मार्शल लॉ लागू होणार? शाहबाज मंत्रिमंडळात मोठी खलबतं

इम्रान सरकारमधील मंत्री

2018 मध्ये, इम्रान सरकारच्या कार्यकाळात, फवाद चौधरी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे फेडरल मंत्री बनले होते.

यानंतर, 14 एप्रिल 2021 ते 10 एप्रिल 2022 पर्यंत ते माहिती आणि प्रसारण मंत्री होते. पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब प्रांतातील केदिना येथे जन्मलेल्या चौधरी यांनी 2012 ते मार्च 2013 दरम्यान पंतप्रधान युसूफ रझा गिलानी आणि राजा परवेझ अश्रफ यांच्या फेडरल मंत्रिमंडळातही काम केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com