Pakistan Afghanistan Border Clash latest news Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan-Afghanistan Conflict: पाक-अफगाण सीमेवर रक्तपात! हवाई हल्ले अन् चकमकीत 500 अफगाण नागरिकांचा मृत्यू; युनायटेड नेशन्सचा धक्कादायक रिपोर्ट

Pakistan Afghanistan Border Clashes Unama Report: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या भीषण लष्करी चकमकींनी अत्यंत भयंकर रुप धारण केले.

Manish Jadhav

Pakistan Afghanistan Border Clashes Unama Report: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या भीषण लष्करी चकमकींनी अत्यंत भयंकर रुप धारण केले. ऑक्टोबरपासून जून महिन्याच्या अखेरपर्यंत पाकिस्तानने केलेल्या सीमेपलीकडील हल्ल्यांमध्ये तब्बल 500 निष्पाप अफगाण नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, 1216 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र सहाय्य मिशनने प्रसिद्ध केलेल्या एका खळबळजनक अहवालातून हा धडकी भरवणारा पर्दाफाश झाला. पाकिस्तानच्या या वाढत्या लष्करी आक्रमणामुळे सीमेवरील नागरिकांचे जनजीवन उध्वस्त झाले असून, संपूर्ण परिसरात दहशतीचे सावट पसरले.

दोन्ही देशांमधील तणाव गेल्या अनेक महिन्यांपासून खदखदत होता, मात्र फेब्रुवारी महिन्यात अफगाण सैन्याने पाकिस्तानच्या चिथावणीखोर हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देत प्रतिहल्ला चढवला, त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. या घटनेनंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्ध थेट 'उघड युद्धाची' घोषणाच करुन टाकली. पाकिस्तानचा आरोप आहे की, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार 'तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान' सारख्या भारत आणि पाक-विरोधी दहशतवादी संघटनांना आपल्या भूमीत सुरक्षित आश्रय देत आहे.

तालिबान सरकारने हे सर्व आरोप फेटाळून लावले असले, तरी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत घुसून बाँबहल्ले सुरुच ठेवले. मार्च महिन्यात काबुलमधील एका ड्रग्ज पुनर्वसन केंद्रावर पाकिस्तानने (Pakistan) केलेला हवाई हल्ला हा आंतरराष्ट्रीय स्तरावर टीकेचा धनी ठरला, ज्याला मानवाधिकार संघटना 'ॲम्नेस्टी इंटरनॅशनल'ने थेट 'युद्ध गुन्हे' घोषित करत स्वतंत्र तपासाची मागणी केली.

युनामाच्या अहवालात पाकिस्तानच्या क्रूर रणनीतीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. पहिल्या हवाई हल्ल्यानंतर जेव्हा स्थानिक नागरिक ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना वाचवण्यासाठी घटनास्थळी गोळा व्हायचे, तेव्हा पाकिस्तानकडून त्याच जागेवर दुसरा हवाई हल्ला केला जायचा. 28 जून रोजी पकतिया प्रांतात एका निवासी इमारतीवर अशाच प्रकारे लागोपाठ दोन हल्ले करण्यात आले, ज्यात 5 बालकांसह 22 जणांचा मृत्यू झाला आणि 185 जण जखमी झाले. बहुतांश जीवितहानी ही बचावकार्यादरम्यान झालेल्या दुसऱ्या हल्ल्यातच झाली.

या गंभीर अहवालावर सफाई देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दावा केला की, त्यांच्या सैन्याने केवळ दहशतवाद्यांचे अड्डे आणि ट्रेनिंग सेंटर लक्ष्य केले होते, नागरिकांना नाही. मात्र, युनायटेड नेशन्सच्या या उघडकीस आलेल्या अहवालामुळे पाकिस्तानचा क्रूर चेहरा जगासमोर पुन्हा एकदा आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT