Pakistan Bus Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात! बलुचिस्तानमध्ये प्रवासी बस खोल दरीत कोसळली; 40 ठार, 8 जण गंभीर जखमी

Pakistan Bus Accident News: बलुचिस्तान प्रांतात झालेल्या एका मोठ्या बस अपघातात तब्बल 40 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य 8 जण गंभीररीत्या जखमी झाले.
 Pakistan Bus Accident News
Pakistan Bus AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Bus Accident News: पाकिस्तानमधून भीषण अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली. बलुचिस्तान प्रांतात झालेल्या एका मोठ्या बस अपघातात तब्बल 40 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य 8 जण गंभीररीत्या जखमी झाले. हा भीषण अपघात खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान प्रांताच्या सीमेवरील शेरानी-झोब महामार्गावर असलेल्या दानसर भागात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी बस क्वेटा येथून राजधानी इस्लामाबादच्या दिशेने जात होती. प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली ही बस अचानक अनियंत्रित झाली आणि थेट खोल दरीत कोसळली, ज्यामुळे घटनास्थळावर एकच खळबळ उडाली.

या भीषण अपघाताचे सर्वात मुख्य आणि धक्कादायक कारण म्हणजे बसमध्ये केलेली प्रचंड ओव्हरलोडिंग असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. ही बस सुरुवातीपासूनच प्रवाशांनी खचाखच भरलेली होती आणि काही लोक तर बसच्या छतावरही बसले होते. या बसमध्ये आधीच 36 प्रवासी होते; परंतु वाटेतच दुसरी एक बस नादुरुस्त झाल्यामुळे त्या बसमधील प्रवाशांनाही याच बसमध्ये बसवण्यात आले. क्षमतेपेक्षा जास्त वजन आणि ओव्हरलोडिंग झाल्यामुळेच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. बलुचिस्तान सरकारच्या प्रवक्त्यांनी या अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला असून मेडिकल इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटरच्या पथकाने घटनास्थळावरुन 40 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले.

 Pakistan Bus Accident News
Pakistan Attack: सीमाभाग रक्ताने माखला! पाकड्यांचा अफगाणिस्तानवर मोठा हल्ला, 29 बंडखोरांचा मृत्यू

त्याचवेळी, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, आरोग्य कर्मचारी आणि शेजारील खैबर पख्तुनख्वा प्रांताचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 6 रुग्णवाहिका, 12 आपत्कालीन वैद्यकीय पथके आणि 10 मदतवाहनांच्या साहाय्याने दरीतून मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्याचे मोठे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले. अपघातातून सुदैवाने वाचलेल्या 8 जखमींना तातडीने झोब येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.

 Pakistan Bus Accident News
Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

शेरानीचे उपायुक्त हजरत वली काकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या भीषण दुर्घटनेवर पाकिस्तानचे (Pakistan) राष्ट्रपती आसिफ अली जरदारी आणि बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सर्फराज बुगती यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना जाहीर करत जखमींना योग्य आणि मोफत उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com