Arrested
Arrested Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: पेशावर मशीद ब्लास्ट प्रकरणी 17 जण गजाआड, 100 हून अधिक जणांना गमवावा लागला जीव

दैनिक गोमन्तक

Peshawar Attack: पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीत झालेल्या आत्मघातकी स्फोटाप्रकरणी 17 जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या स्फोटात 97 पोलिसांसह 101 जणांचा मृत्यू झाला आहे.

लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अधिकाऱ्यांना दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध झिरो टॉलरन्सचे धोरण स्वीकारण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण

सोमवारी जुहरच्या नमाजाच्या वेळी पुढच्या रांगेतील एका तालिबानी आत्मघाती हल्लेखोराने स्वत:ला उडवले. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी संशयाच्या आधारे 17 जणांना अटक केली आहे. संशयितांची चौकशी सुरु आहे.

ज्याने हल्ल्याची जबाबदारी घेतली

तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेने आत्मघातकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) त्यांचा कथित कमांडर उमर खालिद खुरासानी याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हा हल्ला होता.

काय म्हणाले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर?

मंगळवारी रावळपिंडी येथे लष्करी अधिकाऱ्यांच्या परिषदेत जनरल मुनीर म्हणाले की, 'देशातून दहशतवादाचा (Terrorism) नायनाट करण्यासाठी लष्कर सज्ज आहे.' पेशावर मशिदी हल्ल्याचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की, "असे अनैतिक आणि भ्याड हल्ले दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या देशाच्या संकल्पाला धक्का देऊ शकत नाहीत, परंतु कोणत्याही दहशतवादी संघटनेविरुद्ध झिरो टॉलरन्सचे धोरण स्वीकारले पाहिजे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT