Peshawar Bomb Blast: पेशावर मशिदीत नमाजनंतर स्फोट; 56 ठार, 190 हून अधिक जखमी

मशिदीचा एक भाग कोसळला, अनेकजण गाडले गेल्याची भीती
Peshawar Bomb Blast
Peshawar Bomb BlastDainik Gomanak
Published on
Updated on

Peshawar Bomb Blast: पाकिस्तानची भूमी पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरली आहे. पेशावरमधील पोलिस लाइन्सजवळ असलेल्या मशिदीत मशिदीत सोमवारी नमाजपठणानंतर भीषण स्फोट झाला. हा आत्मघाती हल्ला आहे. फिदायीन हल्लेखोर सुमारे 550 नागरिकांमध्ये येऊन बसला होता. या स्फोटात 56 जण ठार झाले असून 190 हून अधिक नागरीक जखमी झाल्याची माहिती आहे.

स्फोट एवढा जोरदार होता की त्यामुळे मशिदीचा एक भाग पूर्णपणे कोसळला आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये स्फोटानंतर गोंधळाचे वातावरण दिसत आहे.

Peshawar Bomb Blast
Putin Threatened Johnson: तुमच्यावर मिसाईल अ‍ॅटॅक करायला फक्त 1 मिनिट लागेल...

पेशावरच्या लेडी रीडिंग हॉस्पिटलचे (एलआरसी) प्रवक्ते मोहम्मद असीम यांनी पाकिस्तानी मीडियाला सांगितले की, जखमींना अजूनही रुग्णालयात आणले जात आहे, काहींची प्रकृती गंभीर आहे.

परिसराची संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली असून केवळ रुग्णवाहिकांनाच प्रवेश दिला जात आहे. पोलीस अधिकारी सिकंदर खान यांनी सांगितले की, इमारतीचा काही भाग कोसळला आहे. अनेक लोक त्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी झाला. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

Peshawar Bomb Blast
Khalistani Attacks Indians: मेलबर्नमध्ये तिरंगा घेतलेल्या भारतीयांवर खलिस्तानवाद्यांचा हल्ला

याआधीही पाकिस्तानमध्ये मशिदीवरील हल्ले झाले आहेत. 16 मे 2022 रोजी कराचीत एमए जिना रोडवरील मेमन मशिदीजवळ स्फोट झाला, त्यात एका महिलेचा मृत्यू तर 8 जण जखमी झाले होते. तर 13 मे 2022 च्या रात्री बॉम्बस्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू आणि 13 जण जखमी झाले होते.

हा स्फोट कराचीतील सर्वात वर्दळीच्या व्यावसायिक भागात एका हॉटेलबाहेरील डस्टबिनमध्ये झाल्याचे पोलिसांनी सांगितले होते. हा स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूच्या अपार्टमेंट, दुकाने, कारच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि परिसरात आग लागली होती.

यापूर्वी 26 एप्रिल 2022 रोजी पाकिस्तानमधील कराची विद्यापीठात आत्मघाती हल्ला झाला होता. यामध्ये 3 चिनी आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा आत्मघाती हल्लेखोर शरी बलोच याने हा हल्ला केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com