Hafiz Saeed  Dainik Gomantak
ग्लोबल

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

Lashkar E Taiba Chief Hafiz Saeed Named Accused: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सोमवारी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई केली.

Manish Jadhav

Pahalgam Terror Attack NIA Supplementary Charge Sheet: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सोमवारी एक मोठी आणि महत्त्वपूर्ण कारवाई केली. एनआयएने जम्मू येथील विशेष न्यायालयात या प्रकरणाची सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल केली असून, यामध्ये पाकिस्तानात बसलेला लश्कर-ए-तैयबाचा प्रमुख आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला मुख्य आरोपी म्हणून नामनिर्देशित केले. या आत्मघातकी हल्ल्याच्या कटात हाफिज सईद वैयक्तिकरित्या सामील होता, असा थेट आरोप एनआयएने ठेवला.

बंदी घातलेली दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा आणि तिची विंग 'द रेजिस्टेंस फ्रंट' यांनी या हल्ल्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि या दोन्ही संघटनांवर हाफिज सईदचे पूर्ण नियंत्रण आहे.

हाफिज सईदविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 आणि बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायदा (UAPA), 1967 च्या विविध कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. एनआयएने या चार्जशीटमध्ये हाफिज सईदवर भारताच्या एकात्मतेवर आघात करणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे आणि सीमेपलीकडून हिंसक कट रचणे यांसारखे दंडात्मक आरोप लावले आहेत. एकूण 1597 पानांच्या या विस्तृत दोषारोपपत्रामध्ये पाकिस्तानचा कुटील कट, हाफिज सईदची प्रत्यक्ष भूमिका आणि एनआयएने अत्यंत वैज्ञानिक व तांत्रिक पद्धतीने गोळा केलेले जमिनी स्तरावरील पुरावे सविस्तरपणे मांडण्यात आले आहेत.

यापूर्वी, एनआयएने 15 डिसेंबर 2025 रोजी दाखल केलेल्या पहिल्या दोषारोपपत्रात पाकिस्तानी हँडलर साजिद जट्ट याला आरोपी केले होते. तसेच जुलै 2025 मध्ये राबवण्यात आलेल्या 'ऑपरेशन महादेव' दरम्यान सुरक्षा दलांच्या हातून ठार झालेले तीन दहशतवादी आणि अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींचाही त्यात समावेश होता. पहलगाम येथील हा भीषण दहशतवादी हल्ला 22 एप्रिल 2025 रोजी झाला होता, जेव्हा पाकिस्तान (Pakistan) पुरस्कृत दहशतवाद्यांनी निरपराध पर्यटकांना लक्ष्य केले होते.

दहशतवाद्यांनी लोकांचे धर्म विचारुन अत्यंत क्रूरपणे गोळीबार केला होता, ज्यामध्ये 25 पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला होता. महिला आणि मुलांसमोर त्यांच्या पती आणि वडिलांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला पहलगाम पोलीस ठाण्यात दाखल असलेला हा गुन्हा गृहमंत्रालयाने गांभीर्य ओळखून एनआयएकडे सुपूर्द केला होता. पाकिस्तान भारतीय भूमीवर सतत दहशतवादाला खतपाणी घालत असून, या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कटाचा पर्दाफाश करण्यासाठी एनआयएचा तपास अद्यापही वेगाने सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

'पोर्तुगीज येण्यापूर्वीपासून गोमंतकीय वारी करतायेत', CM सावंतांचं वक्तव्य; भक्तांसाठी उभारणार 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन'

Madhya Pradesh Abortion Case: गर्भ की गर्भपात? फैसला फक्त आईचा, बापाचा नाही! 2 वर्षांच्या संसारानंतर वेगळ्या झालेल्या महिलेसाठी 'कोर्ट' बनले पाठीराखा

'रेती टंचाई', सीमाभागात भडकलं 'दरयुद्ध'; स्थानिक पुरवठा अपुरा, गोवा-सिंधुदुर्गातील बांधकाम साहित्याच्या दरवाढीचा उद्योगांवर परिणाम

SCROLL FOR NEXT