Pakistan ODI Cricket Record: वनडे क्रिकेटमधील लाजिरवाणा रेकॉर्ड; एकाच डावात 6 फलंदाज 'डक'वर आऊट, क्रिकेट विश्वात पाकड्यांची पुन्हा नाचक्की

ODI Cricket History Worst Batting Records: वनडे क्रिकेटच्या प्रदीर्घ इतिहासात आतापर्यंत केवळ 6 वेळा अशी घटना घडली, जिथे एकाच डावात 6 फलंदाज शून्यावर झाले.
ODI Cricket History Worst Batting Records
Pakistan ODI Cricket RecordDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan ODI Cricket Record: क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज शून्यावर आऊट होणे ही अत्यंत सामान्य गोष्ट मानली जाते. मात्र, जेव्हा एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यात एकाच डावात संपूर्ण संघातील तब्बल 6 फलंदाज खातेही न उघडता पॅव्हेलियनमध्ये परततात, तेव्हा ती कोणत्याही संघासाठी अत्यंत लाजिरवाणी आणि नामुष्कीची स्थिती असते. वनडे क्रिकेटच्या प्रदीर्घ इतिहासात आतापर्यंत केवळ 6 वेळा अशी घटना घडली, जिथे एकाच डावात 6 फलंदाज शून्यावर झाले.

विशेष म्हणजे, या नकोशा आणि लाजिरवाण्या विक्रमाची सुरुवात केवळ पाकिस्तानने केली नाही, तर हा लाजिरवाणा विक्रम सर्वाधिक म्हणजेच तब्बल 3 वेळा आपल्या नावावर करण्याचा नकोसा पराक्रमही पाकिस्ताननेच केला. या यादीत पाकिस्तान व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) या संघांचा प्रत्येकी एक-एक वेळा समावेश आहे.

ODI Cricket History Worst Batting Records
Babar Azam: देशानं सोडलं, पण परदेशानं स्वीकारलं! पाकीस्तानचा बाबर आझम आता ऑस्ट्रेलियात खेळणार टी-20 क्रिकेट

या अनपेक्षित आणि लाजिरवाण्या रेकॉर्डची सुरुवात 25 मे 1987 रोजी बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात झाली होती. या सामन्यात पाकिस्तानने 9 बाद 213 धावा केल्या होत्या, पण धक्कादायक बाब म्हणजे त्यांचे 6 फलंदाज शून्यावर बाद झाले होते. 6 फलंदाज डकवर आऊट होऊनही संघाने 200 पेक्षा जास्त धावा करणे ही एक आश्चर्यकारक गोष्ट होती. यानंतर सुमारे 6 वर्षांनी, 25 फेब्रुवारी 1993 रोजी केपटाऊनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पाकिस्तानची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली.

ODI Cricket History Worst Batting Records
Babar Azam: भारताचं प्रत्युत्तर बघून बाबर आझमची झोप उडली; मोहम्मद अली जिन्नाला आठवत म्हणाला "पाकिस्तानला....."

संपूर्ण संघ अवघ्या 43 धावांवर ऑलआऊट झाला आणि पुन्हा एकदा 6 फलंदाज शून्यावर बाद झाले. हा सामना आजही वनडे इतिहासातील सर्वात खराब फलंदाजीच्या कामगिरींपैकी एक मानला जातो. त्यानंतर 16 जून 2012 रोजी कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने 199 धावा केल्या, पण तिसऱ्यांदा त्यांच्या 6 फलंदाजांना खाते उघडता आले नाही. यासह पाकिस्तान (Pakistan) वनडे इतिहासात तीनदा हा नकोसा विक्रम करणारा जगातील पहिला संघ बनला.

ODI Cricket History Worst Batting Records
Babar Azam: भारताविरुद्धच्या पराभवानंतर बाबरचा कसा केला पाकिस्तान टीमने वाढदिवस साजरा, पाहा Video

पाकिस्तानशिवाय इतरही काही संघ या यादीत सामील झाले. 22 जानेवारी 2002 रोजी सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दक्षिण आफ्रिकेचा संघ 106 धावांवर गारद झाला आणि त्यांचे 6 फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यानंतर 20 नोव्हेंबर 2008 रोजी हरारे येथे श्रीलंकेविरुद्ध झिम्बाब्वेने 127 धावा केल्या, पण त्यांच्याही 6 फलंदाजांना धावांचे खाते उघडता आले नाही. या लाजिरवाण्या यादीत सर्वात नवीन नाव संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई या संघाचे जोडले गेले. 7 नोव्हेंबर 204 रोजी अल अमिरात येथे ओमानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात युएईचा संघ अवघ्या 78 धावांवर संपुष्टात आला. या डावात त्यांचेही 6 फलंदाज एकही धाव न घेता बाद झाले आणि त्यांनी या नकोशा क्लबमध्ये आपले नाव नोंदवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com