14.5 million US children Corona Positive: अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स (AAP) आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटल असोसिएशनचा ताजा अहवाल समोर आला आहे. अहवालानुसार, जगातील सर्वात शक्तिशाली आणि आरोग्य सेवांच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या यूएसमध्ये सध्या 14.5 दशलक्षाहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी, गेल्या चार आठवड्यात 343,000 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
ऑगस्टमध्ये 90 हजारांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली
दरम्यान, गेल्या ऑगस्टपर्यंत देशातील सुमारे 90,600 मुलांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. संभाव्य दीर्घकालीन परिणामांचे मूल्यांकन करण्यासाठी वय-विशिष्ट डेटा गोळा करणे आवश्यक असल्याचेही सांगितले जात आहे.
जलद लसीकरण कार्यक्रम असूनही परिस्थिती अनियंत्रित
अमेरिकेन आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण (Vaccination) कार्यक्रम सुरु असतानाही मुलांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोनाची (Coronavirus) लक्षणे आढळून येणे ही चिंतेची बाब आहे. सर्व मुलांची योग्य काळजी घेतली जात आहे. त्यामुळे सध्या काळजी करण्यासारखे काही नाही.
अमेरिकेत नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव वाढला
ताज्या संशोधनानुसार, शास्त्रज्ञांना अमेरिकेत कोरोनाचे ओमिक्रॉनचे नव-नवे व्हेरिएंट समोर येऊ लागले आहेत. गेल्या आठवड्यात BA.4.6 च्या नव्या व्हेरिएंटमुळे अमेरिकेत 8 टक्के रुग्णांची नोंद झाल्याचा दावा केला जात आहे. पण उत्तम प्रतिकारशक्तीमुळे लोक त्यावर मात करु शकतात. मात्र, येत्या काही दिवसांत नवीन रुग्णांची संख्या वाढू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.