Maldivian President Mohamed Muizzu Dainik Gomantak
ग्लोबल

Mohamed Muizzu: ''आता कळेल मालदीवची जनता स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर...''; मोइज्जू यांनी पुन्हा भारताविरोधात ओकली गरळ

Maldives President Mohamed Muizzu: मालदीवमध्ये नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत अध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांनी घवघवीत यश मिळवले.

Manish Jadhav

Maldives President Mohamed Muizzu: मालदीवमध्ये नुकत्याच झालेल्या संसदीय निवडणुकीत अध्यक्ष मोहम्मद मोइज्जू यांनी घवघवीत यश मिळवले. मालदीवच्या जनतेने चीन धार्जिण्या मोइज्जू यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. मोइज्जू म्हणाले की, ''मालदीवचे लोक विशेषत: सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर कुठे उभे आहेत हे आता आंतरराष्ट्रीय समुदायाला समजेल.'' संसदीय निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर सोमवारी एका कार्यक्रमात मोइज्जू बोलत होते. दरम्यान, रविवारी झालेल्या निवडणुकीत त्यांचा पक्ष पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी) ने 93 पैकी 68 जागा जिंकल्या. तर पीएनसीच्या अलायन्स मालदीव नॅशनल पार्टी (एमएनपी) ने एक जागा जिंकली आणि मालदीव डेव्हलपमेंट अलायन्स (एमडीए) ने दोन जागा जिंकल्या. त्यामुळे पीपल्स मजलिस (संसदे) मध्ये त्यांची एकूण संख्या दोन तृतीयांश पेक्षा जास्त झाली.

दरम्यान, संसदेत बहुमत म्हणजे मुइज्जू यांचा पक्ष केवळ कायदाच बनवणार नाहीतर कायदे मंजूर करणाऱ्या विधीमंडळावरही नियंत्रण ठेवणार आहे. संसदीय निवडणुकीत पीएनसीचा दणदणीत विजय हा भारताच्या परराष्ट्र धोरणाला धक्का मानला जात आहे. हिंद महासागरातील या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या देशातील निवडणुकांच्या निकालावर भारत आणि चीन या दोन्ही देशांचे बारकाईने लक्ष होते. काही महिन्यांपूर्वी मोइज्जू यांनी भारताशी पंगा घेत मालदीवमध्ये इंडिया आऊट कॅम्पेन चालवले. या कॅम्पेनच्या जोरावरच ते गेल्या वर्षी सत्तेत आले. नोव्हेंबरमध्ये पदभार स्वीकारताच त्यांनी चीनला भेट दिली आणि संरक्षणासह विविध क्षेत्रात बीजिंगसोबत करार केले.

संसदीय निवडणुकीपूर्वी, भारत समर्थक माजी अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख विरोधी पक्ष एमडीपीने भारताशी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यावर भर दिला. परंतु एमडीपीला केवळ 15 जागा मिळाल्या. 88 भारतीय लष्करी जवानांना मालदीवमधून धाडणारे मोइज्जू म्हणाले की, ''मालदीवचे लोक विशेषत: सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर कुठे उभे आहेत हे आता आंतरराष्ट्रीय समुदायाला समजेल.''

कोणत्याही देशाचे नाव न घेता मोइज्जू म्हणाले की, संसदीय निवडणुकीच्या निकालाने हे सिद्ध केले आहे की मालदीवच्या जनतेला परकीय दबावाशिवाय त्यांच्या भविष्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हवे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT