Maldivian President Mohamed Muizzu: मालदीवचे 'भारतविरोधी' राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सध्या मालदीवमधील परिस्थिती भारत आणि चीनभोवती फिरत आहे. मालदीवमधील विरोधी पक्षांच्या वक्तव्यावरुन त्यांना भारत समर्थक म्हणता येईल.
अलीकडेच मुइज्जू यांनी विरोधकांच्या मान्यतेशिवाय चार खासदारांचा आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला. मुइज्जू यांच्या या कृतीमुळे संतप्त झालेल्या प्रमुख विरोधी पक्ष आणि संसदेत संख्यात्मकदृष्ट्या सर्वात जास्त संख्याबळ असलेल्या एमडीपीने मुइज्जू यांच्याविरोधात महाभियोग आणण्याची तयारी सुरु केली. आता स्थानिक वृत्तवाहिन्यांनी अहवाल दिला आहे की, मुइज्जू यांच्या स्वतःच्या पक्षातील अनेक खासदारांनी विरोधी पक्षांना पाठिंबा देण्यास स्वारस्य दाखवले आहे.
दरम्यान, चीनशी (China) मैत्री हे आपले आद्य कर्तव्य मानणारे मोहम्मद मुइज्जू यांना सत्तेत येऊन अवघे तीन महिने झाले आहेत. मात्र आता, त्यांची सत्ता धोक्यात आली आहे. मालदीवच्या संसदेत सर्वाधिक संख्याबळ असलेल्या मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टीने (एमडीपी) डेमोक्रॅट्सच्या मदतीने मुइज्जू यांना सत्तेवरुन हटवण्यासाठी पावले उचलली आहेत. मुइज्जू यांच्यावर महाभियोग चालवण्याचा धोका निर्माण झाला आहे. मालदीवच्या संसदेतील विरोधकांना मोइज्जू यांना अध्यक्षपदावरुन दूर करण्यासाठी 54 खासदारांची आवश्यक आहे, तर विरोधकांचा दावा आहे की त्यांच्याकडे 56 खासदार आहेत.
दरम्यान, धक्कादायक बातमी अशी आहे की, सत्ताधारी पक्ष पीएनसीच्या काही खासदारांनी विरोधी पक्ष मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) आणि डेमोक्रॅट्ससोबत काम करण्यास स्वारस्य दाखवले आहे. 42 सदस्यांसह पीपल्स मजलिस (संसद) मधील सर्वात मोठा पक्ष MDP, मोहम्मद मुइज्जू यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी डेमोक्रॅट्ससोबत काम करत आहे.
बुधवारी एमडीपीचे उपाध्यक्ष अहमद अब्दुल्ला यांनी सांगितले की, सत्ताधारी पीपल्स नॅशनल काँग्रेस (पीएनसी) च्या काही खासदारांनी अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना हटवण्यासाठी विरोधकांसोबत काम करण्यास स्वारस्य दाखवले आहे, असे मालदीवियन न्यूज आउटलेट अधाधुने वृत्त दिले आहे. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते की, "अन्य पक्षातील खासदारांना मुइज्जू यांच्याविरोधात महाभियोग चालवण्यात रस आहे का? ते अजूनही आहे. सरकारी खासदारांच्या पाठिंब्याने ते होईल, असा आम्हाला विश्वास आहे," असेही ते पुढे म्हणाले.
आउटलेट Sun.mv नुसार, MDP आणि डेमोक्रॅट्सचे मिळून 87 सदस्य असलेल्या मालदीव संसदेत 56 खासदार आहेत. मालदीवच्या संविधानाने राष्ट्रध्याक्षांवर 56 मतांनी महाभियोग चालवण्याची परवानगी दिली आहे. तथापि, अलीकडेच महाभियोग प्रक्रियेशी संबंधित संसदेच्या कार्यपद्धतीच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. सुधारित नियमांनुसार, संसदेची एकूण सदस्यसंख्या ही विद्यमान खासदारांची संख्या असेल. अहवालानुसार, एकूण सदस्यसंख्या 87 खासदार मानण्याऐवजी ही संख्या 80 खासदारांवर आणण्यात आली आहे. त्यामुळे महाभियोग प्रकरणातील बहुमतही कमी होईल.
दुसरीकडे, काही मंत्रिपदाच्या नियुक्त्या नाकारण्याच्या निर्णयाला सत्ताधारी युतीच्या खासदारांनी विरोध केल्यानंतर आणि संसदेची बैठक उधळून लावल्यानंतर अध्यक्ष मुइज्जू यांच्यावर महाभियोग चालवण्याची विरोधकांची हालचाल लक्षात घेण्याजोगी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.