Britain Dainik Gomantak
ग्लोबल

UK: ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर, 24 तासांत 97 जणांचा मृत्यू

UK Covid Cases: ब्रिटनमध्ये मोठ्याप्रमाणात लोकसंख्येचे लसीकरण होऊनही कोरोना व्हायरसच्या रूग्णात वाढ एका दिवसात ९७ रुग्णांच्या मृत्यू

दैनिक गोमन्तक

ब्रिटन येथे मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यानंतर सुध्दा कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रविवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशात एका दिवसात 11,472 नवीन रूग्णांची नोंद केली, ज्यामुळे एकूण संसर्गाची (infection) संख्या ही 1,44,75,192 झाली आहे. तर ब्रिटनमध्ये 24 तासांत 97 जणांना कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 150,154 वर पोहोचली आहे.(covid 19 death ratio)

कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागलेल्या 1,50,154 लोकांच्या संदर्भात ब्रिटनच्या (Britain) पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर काळ्या बॅकग्राउंडवर मेसेज पोस्ट करून याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.कोरोना विषाणूमुळे मृत्यूच्या बाबतीत अमेरिका, ब्राझील, भारत (india), रशिया, मेक्सिको आणि पेरू नंतर ब्रिटन जगातील सातवा सर्वाधिक रूग्णसंख्या असलेला देश आहे. दरम्यान, लंडनमधील सार्वजनिक प्रादेशिक आरोग्य संचालक प्रोफेसर (professor) केविन फेंटन म्हणतात की, राजधानी एकतर पास झाली आहे किंवा संक्रमणाच्या नवीनतम लाटेचा सामना करत आहे.

90% संरक्षण देते बूस्टर डोज

फेंटन यांनी ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स (ONS) ने दिलेल्या डेटाच्या आधारे म्हटले की, कोरोना संसर्गाची लागण झालेले रूग्णाचे प्रमाण जास्त असले तरी शहरात एकूण रूग्णांमध्ये घट होत आहे. याचे कारण असे की लंडनमधील आकडेवारी दर्शवते की 10 पैकी फक्त एकाला कोविड(covid)ची लागण झाली आहे. ब्रिटीश (british)शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, कोविडचा बूस्टर डोस हा 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना किमान तीन महिन्यांसाठी 90 टक्के संरक्षण देऊ शकतो, ज्यामुळे त्यांचे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी होते.

सध्या चौथ्या लसीची गरज नाही

ब्रिटनच्या हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीच्या म्हणण्यानुसार कमी प्रतिकारशक्ती (immunity)असलेल्या लोकांना चौथी लस लवकर देण्याची आवश्कता नाही असे. कारण पहिला डोस हा 82 टक्क्यांहून अधिक लोकांना मिळाला आहे, तर 61 टक्क्यांहून अधिक लोकांना बूस्टर डोस म्हणजेच कोरोना व्हायरस लसीचा तिसरा डोस मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT